Friday, July 5, 2024

कियाराचा इंदू की जवानी बॉक्स ऑफिस वर आपटला! का फिरवली प्रेक्षकांनी पाठ, वाचा सविस्तर

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्ये थिएटर्स बंद होते. तब्बल आठ महिने बंद राहिल्यानंतर थिएटर्स १५ ऑक्टोबरपासून खुली झाली आहेत. लॉकडाऊननंतर अभिनेत्री कियारा अडवाणी स्टारर ‘इंदू की जवानी’ हा बॉलिवूडचा तिसराच चित्रपट आहे जो चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. पण हा सिनेमा बॉक्स ऑफिस वर काही खास कामगिरी करू शकलेला नाही. प्रेक्षकही या सिनेमाकडे पाठ फिरवत आहेत.

अबीर सेनगुप्ता दिग्दर्शित इंदू की जवानी चित्रपटात कियाराने उत्तर प्रदेशातील गाझियाबादमधील एका मुलीची भूमिका साकारली आहे. तिच्याबरोबर आदित्य सील हा मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाची कथा ही डेटिंग ऍप च्या गैरवापरावर भाष्य करते. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, दिव्या खोसला कुमार, कृष्णा कुमार (टी-सिरीज), मोनिषा अडवाणी, मधु भोजवानी, निखिल अडवाणी (एम्मे एंटरटेन्मेंट) आणि निरंजन अय्यंगार, रायन स्टीफन्स (इलेक्ट्रिक अँपल्स एंटरटेनमेंट) यांनी केली आहे.

इंदू की जवानी चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनचा विचार केला तर या चित्रपटाने काही खास कमाल केलेली नाही. ११ डिसेंबर रोजी रिलीज झालेल्या या चित्रपटाचे पहिल्या दिवसाचं नेट कलेक्शन सुमारे २५ लाख रुपये इतकंच होतं. रिलीजच्या दुसर्‍या दिवशी, शनिवारी आणि रविवारी तिसर्‍या दिवशी, कलेक्शन मध्ये कोणतीही विशेष वाढ झालेली नाही. जर इंदू की जवानी हा सिनेमा सामान्य दिवसात रिलीज झाला असता तर पहिल्याच दिवशी ७५ लाखांचा तरी गल्ला नक्कीच जमवू शकला असता.

ओव्हर्सिज मध्ये देखील इंदू की जवानी हा फ्लॉप ठरला आहे. ऑस्ट्रेलिया मध्ये गेल्या तीन दिवसांमध्ये या चित्रपटाने फक्त ५.७९ लाखांचाच गल्ला जमवला आहे. न्यूझीलंड मध्ये १.६५ लाख तर फिजी मध्ये १.९२ लाख रुपयांचाच गल्ला हा सिनेमा जमवू शकला आहे. चित्रपटगृहांच्या या परिस्थितीमुळे नवे बिग बजेट सिनेमे चित्रपट गृहांमध्ये प्रदर्शित करणं एक फार मोठं आव्हान निर्मात्यांपुढे असणार आहे.

हे देखील वाचा