Saturday, June 29, 2024

‘बहरला हा मधुमास’ गाण्याची किली आणि निमा पॉलला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

आजच्या काळात जगण्यासाठी अन्न, वस्त्र आणि निवारा यासोबतच सोशल मीडिया ही चौथी मूलभूत गरज बनली आहे. या सोशल मीडियाच्या जगातले एक अतिशय गाजणारी गोष्ट म्हणजे रील. विविध संवाद, गाणी, डान्स आदी अनेक गोष्टींवर मजेशीर, माहिती देणारे असे काही सेकंदाचे व्हिडिओ करणे म्हणजे रील होय.

या रिलचे वेड सामान्य लोकांपासून कलाकारांपर्यंत सर्वानाच मोठ्या प्रमाणावर आहे. असे देखील जगभरात लोकं आहेत, ज्यांना या रिल्सने अमाप लोकप्रियता मिळवून देत जगभरात ओळख देखील दिली. सोशल मीडियाची पोहच देखील खूपच दूरवर असल्याने अनेक लहान मोठ्या देशातील सामान्य लोकं देखील इथे स्टार झाले आहे. अशीच एक स्टार बहीण भावाची जोडी म्हणजे किली आणि निमा पॉल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ankush Chaudhari (@ankushpchaudhari)

टांझानिया इथले प्रसिद्ध रिल स्टार असलेले किली आणि त्याची बहिण निमा पॉल यांचे जगभरात असंख्य चाहते आहेत. ते नेहमीच विविध गाण्यावर लिपसिंक करत त्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करतात. आतापर्यंत त्यांचे अनेक व्हिडिओ तुफान व्हायरल झाले आहेत. अशातच सध्या त्यांचा एक व्हिडिओ चांगलाच गाजत आहे आणि तो म्हणजे ‘बहरला हा मधुमास’ या मराठी गाण्यावरील, सध्या सोशल मीडियावर ‘बहरला हा मधुमास’ हे गाणे तुफान गाजत आहे. या गाण्यावर अनेक रिल्स देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. यातलेच एक रील म्हणजे किली आणि निमा यांचे,

शाहीर साबळे यांच्या आयुष्यावर आधारीत असलेला महाराष्ट्र शाहीर हा सिनेमा येत्या २८ एप्रिलला प्रदर्शित होत आहे. या सिनेमातील बहरला हा मधुमास हे गाणे खूपच लोकप्रिय झाले असून, आहे. इन्स्टाग्रामवर तर या गाण्यावर अनेकांनी रिल्स तयार करून पोस्ट केले जात आहेत. अशातच किली आणि त्याची बहिण निमा पॉल यांनी देखील याच गाण्यावर त्यांचे रील बनवले. त्यांचा हा व्हिडिओ अंकुश चौधरी यानं त्याच्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘बहरला हा मधुमास’ गाण्याची किली आणि निमा पॉलला भुरळ, व्हिडिओ पाहून नेटकऱ्यांनी केले एक्सप्रेशनचे कौतुक

अमिताभ यांना ‘ती’ चूक पडलेली महागात; विनोद खन्नांना केले होते रक्तबंबाळ, आजही होत असेल पश्चाताप

हे देखील वाचा