Tuesday, August 12, 2025
Home बॉलीवूड किम कार्दशियनच्या मुलाने पाहिली तिची व्हायरल ‘अश्लिल टेप’, अभिनेत्री म्हणाली, ‘माझी आत्मा मेलीय…’

किम कार्दशियनच्या मुलाने पाहिली तिची व्हायरल ‘अश्लिल टेप’, अभिनेत्री म्हणाली, ‘माझी आत्मा मेलीय…’

किम कार्दशियन (Kim Kardishian) ही हॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या कलाकारांपैकी एक आहे. किम तिचे रियॅलिटी टीव्ही शो, तसेच वादग्रस्त गोष्टींसाठी ओळखली जाते. २००७ मध्ये किम कार्दशियनची एक सेक्सटेप इंटरनेटवर व्हायरल झाली होती. ज्यामुळे चांगलाच गोंधळ उडाला होता. या व्हिडिओमध्ये ती तिचा एक्स बॉयफ्रेंड रेजेसोबत दिसत होती. या सेक्स टेपमुळे किम जगभर प्रसिद्ध झाली. यामुळे तिच्यावर टीकाही झाली होती. मात्र याच क्लिपवरुन नवा वाद समोर आला आहे. आता किमचा सहा वर्षांचा मुलगा सेंट वेस्ट याने चुकून ही सेक्सटेप पाहिल्याची माहिती समोर आली आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चा रंगली आहे.

काही दिवसांपूर्वी किम कार्दशियनचा नवा शो ‘The Kardashians’ लाँच झाला आहे. हा शो किम आणि तिच्या कुटुंबाबद्दल आहे. शोच्या नव्या एपिसोडमध्ये किमचा मुलगा सेंट त्याच्या iPad वर Roblox खेळताना दिसत आहे. या खेळादरम्यान सेंटने किमची प्रसिद्ध रडण्याची इमोजी पाहिल्याचे यामध्ये दिसत आहे. त्याचप्रमाणे या मीममध्ये किमच्या सेक्स टेपचे काही सीन्सही देण्यात आले होते. याविषयी बोलताना किम कार्दशियन म्हणाली की, “हे क्लिकबेट होते ज्यामध्ये तुम्ही त्यावर क्लिक केल्यास नवीन सेक्सटेप येईल, असे सांगण्यात आले होते. माझा मुलगा थोडा मोठा असता त्याला लिहता वाचता येत असते तर माझा जीवच गेला असता.”

साल २००७ मध्ये ही सेक्सटेप समोर आल्यानंतर किम कार्दशियनला अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. यावेळी विविड एंटरटेनमेंट नावाच्या प्रॉडक्शन कंपनीविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या कंपनीने तिची सेक्सटेप इंटरनेटवर टाकल्याचा आरोप किमने केला होता. नंतर कंपनीने किम कार्दशियनच्या या प्रकरणावर तोडगा काढला होता. २०१९ मध्ये एका मुलाखतीत किमला तिचे हे प्रकरण तिच्या मुलांना कसे सांगशील? असे विचारण्यात आले होते. यावेळी कीमने ‘मला वाटते की मी त्याच्याशी प्रामाणिकपणे बोलेन आणि त्याला सत्य सांगेन’ असे स्पष्टिकरण दिले होते.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा