बॉलिवूडमध्ये जेवढ्या प्रेम कहाणी पडद्यावर दाखवल्या जातात, त्यापेक्षा अधिक प्रेम कहाणी पडद्यामागे पाहायला आणि ऐकायला मिळत असतात. कोणत्या कलाकाराचे हृदय कोणासाठी धडकत आहे किंवा कोणत्या कलाकाराने कोणाचे हृदय चोरले आहे, हे जाणून घेण्यासाठी चाहते खूप उत्सुक असतात. अनेक कलाकार सोशल मीडियावर त्यांचे प्रेम व्यक्त करतात, तर काहीजण फक्त फोटो शेअर करून त्यातून सगळं काही सांगून जातात. आता अभिनेत्री किम शर्माच्या फोटोसोबत देखील असेच काहीसे होत आहे.
किमने बॉलिवूडमधील अनेक चित्रपटात काम केले आहे. पण ती एक यशस्वी अभिनेत्री म्हणून तिचे नाव कमावू शकली नाही. परंतु तिच्या अफेअरमुळे ती नेहमीच चर्चेत राहिली आहे. सध्या तिचे नाव भारताचा प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस याच्यासोबत जोडले जात आहे. किम आणि लिएंडरचे काही सुंदर फोटो समोर आले आहेत. ते पाहून असे वाटते की, ते दोघे एकमेकांना डेट करत आहेत. तिच्या अफेअरची चर्चा तिचा एक्स बॉयफ्रेंड हर्षवर्धन राणे याच्या कानावर पडली आहे. यावर त्याने त्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. (Kim sharma ex boyfriend hatshvardhan rane reacts on her new relationship)
किम शर्मा आणि लिएंडर पेसने त्यांचे नाते अजून अधिकृत केले नाही. परंतु त्यांचे फोटो पाहून असे समजत आहे की, ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पुरते बुडाले आहेत. यावर किमचा एक्स बॉयफ्रेंड आणि अभिनेता हर्षवर्धन राणे म्हणाला की, “मला याबाबत काहीच माहिती नाहीये. त्यांनी स्वतः त्यांच्या नात्याचा खुलासा करणे चांगले होईल आणि जर ही गोष्ट खरी असेल, तर ते दोघे टाऊनमधील सगळ्यात हॉटेस्ट कपल असतील.”
एके काळी हर्षवर्धन राणे आणि किम शर्मा हे दोघे एकमेकांच्या प्रेमात होते. त्यांच्या रिलेशनबाबत खूप चर्चा चालल्या होत्या. त्यांच्या चाहत्यांना देखील त्यांची जोडी खूप आवडत होती. परंतु काही काळानंतर ते वेगळे झाले. पण त्यांच्या ब्रेकअपचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. हर्षवर्धनच्या बोलण्यावरून असे वाटत आहे की, त्या दोघांनी एकमेकांच्या सहमतीने त्यांचे हे नाते तोडले आहे आणि आजही त्यांच्या मनात एकमेकांबाबत आदर आहे.
किम शर्मा या दिवसात लिएंडर पेससोबत गोव्यामध्ये सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहेत. त्या दोघांचे गोव्यामधील अनेक फोटो व्हायरल होत आहेत. ते दोघांचे जेवतानाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यातून त्यांची केमिस्ट्री साफ दिसत आहे. कदाचित ते लवकरच त्यांच्या नात्याला अधिकृत करू शकतात. त्यांचे चाहते याबाबत खूप उत्सुक असतात.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-