Thursday, April 17, 2025
Home कॅलेंडर पाहा ‘मोहब्बते’ फेम किम शर्मा आज दिसतेय तरी कशी, बिकीनीत होतायत फोटो व्हायरल

पाहा ‘मोहब्बते’ फेम किम शर्मा आज दिसतेय तरी कशी, बिकीनीत होतायत फोटो व्हायरल

बॉलिवूडचा सुपरहिट चित्रपट ‘मोहब्बते’ मधून पदार्पण करणारी अभिनेत्री किम शर्मा बर्‍याच वर्षांपासून रुपेरी पडद्यापासून दूर आहे. पण इतक्या वर्षानंतरही तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. किम शर्मा नेहमीच तिच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून तिचे हॉट आणि बोल्ड फोटोज शेअर करत असते. काही दिवसांपूर्वी तिने तिच्या अकाऊंटवरून असे काही फोटो शेअर केले आहेत जे तिच्या चाहत्यांनी आता व्हायरल करण्यास सुरुवात केली आहे. हे फोटो पहा …

किम शर्मा हीचा जन्म २१ जानेवारी १९८० मध्ये अहमदनगर येथे झाला. तिने तिचं माध्यमिक शिक्षण सेंट जोसेफ कॉन्व्हेंट स्कुल मधून पूर्ण केलं.

यानंतर ती एकदा सहज फिरण्यासाठी दिल्लीला गेली असता तिथे क्लोज अप या टूथपेस्टच्या जाहिरातीसाठी तिने ऑडिशन दिलं आणि त्यात तिची निवड झाली. यानंतर तिला लागोपाठ जाहिरातींमध्ये कामं मिळत गेली.

सनसिल्क, पेप्सी, टाटा सफारी, पॉंड्स, फेअर अँड लव्हली, क्लिन अँड क्लिअर, लिरील इत्यादी ब्रँड्सच्या जाहिरातींमध्ये ती झळकली होती. या सोबतच आपण किमचे काही सुंदर आणि बोल्ड फोटो पाहुयात जे तिने शेअर केले आहेत.

यानंतर तिला आदित्य चोप्राच्या मोहब्बतेमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मोहब्बते या एकाच चित्रपटात तिला मुख्य भूमिका साकारायला मिळाली. त्यानंतर सुद्धा तिने काही चित्रपट केले परंतु त्यात तिला काही फारसं यश मिळालं नाही.

तिने तुमसे अच्छा कौन है, कहता है दिल बार बार, खडगम, फिदा, पद्मश्री लालू प्रसाद यादव, यकीन या सारख्या आणखीन काही चित्रपटांमध्ये तिने कामं केली. यगम हा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला आहे. या सोबतच किम शर्माने शेअर केलेले तिचे काही सुंदर फोटोज आपल्यासाठी…

हे देखील वाचा