Saturday, June 29, 2024

शाहरुख खानचा चिमुकला झाला ८ वर्षांचा; बहीण सुहानाने हटके अंदाजात दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान आणि गौरी खान यांचा सर्वात लहान मुलगा अबराम गुरुवारी (२७ मे) आपला ८ वा वाढदिवस साजरा करत आहे. मोठ- मोठ्या कलाकारांच्या वाढदिवसाची ज्याप्रकारे चर्चा असते, तशीच चर्चा किंग खानच्या चिमुकल्याच्या वाढदिवसाचीही होत आहे. सध्या माध्यमांमध्ये तो झळकताना दिसत आहे. विशेष म्हणजे अबरामचा जन्म सरोगसीद्वारे २७ मे, २००३ रोजी झाला होता. अबरामचा चाहतावर्गही कोणत्याही कलाकारापेक्षा कमी नाही. त्याचे फोटो पोस्ट होताच व्हायरल होऊ लागतात. अबरामच्या नावाने सोशल मीडियावर अनेक फॅन पेजही आहेत, ज्याला लाखो लोक फॉलो करतात. आज अबरामच्या वाढदिवसानिमित्त मोठी बहीण सुहाना खाननेही त्याला हटके अंदाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

सुहानाने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम स्टोरीवर अबरामसोबत मस्ती करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. हा व्हिडिओ सुहानाने शूट केला आहे आणि अबराम येऊन तिच्या गालावर किस करत आहे. व्हिडिओ शेअर करत सुहानाने लिहिले आहे की, “वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा गोड अबराम.”

सुहानाने नुकताच साजरा केला २१ वा वाढदिवस
किंग खानचा चिमुकला आज वाढदिवस साजरा करत आहे. याव्यतिरिक्त सुहाना खानने नुकतेच ५ दिवसांपूर्वी म्हणजेच २२ मे, २०२१ रोजी आपला २१ वा वाढदिवस साजरा केला. सुहानाच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सुहानाने वाढदिवसाच्या दुसऱ्या दिवशी आपला बोल्ड फोटो शेअर केला होता. तिने यामध्ये पेस्टल हिरव्या रंगाचा ड्रेस घातला होता. हा शेअर करत तिने “२१,” असे लिहिले होते. सुहानाच्या या फोटोवर बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांनी आणि तिच्या मित्रमंडळींनी कमेंट्स केल्या होत्या.

सुहानाने नुकतेच आपल्या गर्ल गँगसोबत पूल पार्टी केली होती. ज्याचे फोटोही व्हायरल होत आहेत. फोटोत सुहानाची गर्ल गँग बिकिनीमध्ये दिसत आहे. दुसरीकडे सुहानाने स्वत:ला आपल्या एका मैत्रिणीच्या पाठीमागे लपवत आहे, ज्यामुळे समजत नाहीये की, तिने काय घातले आहे. सुहानाच्या मैत्रिणींनी पूल पार्टीचे फोटो शेअर केले आहेत.

सुहानाने काही दिवसांपूर्वीच आपले इंस्टाग्राम अकाऊंट पब्लिक केले आहे. तिची फॅन फॉलोविंग ही कोणत्याही स्टारपेक्षा कमी नाहीये. सुहानाला इंस्टाग्रामवर लाखो लोक फॉलो करतात.

सुहाना घेतेय अभिनयाचे शिक्षण
सुहाना सध्या न्यूयॉर्कमध्ये अभिनयाचे शिक्षण घेत आहे. कोरोना काळात मागील वर्षी ती मुंबईत आली होती. आता पुन्हा एकदा शिक्षणासाठी ती अमेरिकेला गेली आहे. सुहानादेखील बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेणार आहे. मात्र, यापूर्वी ती आपले शिक्षण पूर्ण करेल आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण करेल. खरं तर सुहानाने एका शॉर्ट फिल्ममार्फत आपले अभिनय पदार्पण केले आहे. ती एका शॉर्ट फिल्ममध्ये झळकली होती. त्यामधील तिच्या अभिनयाला पसंती मिळाली होती.

हे देखील वाचा