Monday, June 9, 2025
Home बॉलीवूड ‘सुलतान’च्या सेटवर अचानक पोहोचलेला ‘पठाण’, पुढं दोघांनीही केलं अविश्वसनीय कृत्य

‘सुलतान’च्या सेटवर अचानक पोहोचलेला ‘पठाण’, पुढं दोघांनीही केलं अविश्वसनीय कृत्य

जसं दिसतं, तसं नसतं असं म्हणतात, हे बॉलिवूडला तंतोतंत लागू होतं. या सिनेसृष्टीत मोठ्या पडद्यावर कलाकारांमध्ये भांडण दाखवतात, पण खऱ्या आयुष्यात त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असतात. मात्र, अनेकदा सिनेमात मित्र म्हणून दिसणारे कलाकार खऱ्या आयुष्यात एकमेकांकडे ढुंकूनही पाहत नाहीत. असेच काहीसे सुपरस्टार शाहरुख खान आणि सलमान खान यांच्याबाबतही होते. या दोघांमध्ये सुरुवातीला सर्वकाही ठीक नव्हते. मात्र, ते आता पुन्हा जीवलग मित्र झाले आहेत. त्यांच्या मैत्रीमुळे ते नेहमीच चर्चेत असतात. सलमान आणि शाहरुख कधीही एखाद्या कार्यक्रमात भेटले, तर त्यांना पाहून चाहतेही खुश होतात. अशातच दोघांचा एक थ्रोबॅक व्हिडिओ समोर आला आहे.

या व्हायरल होत असलेल्या थ्रोबॅक व्हिडिओत (Throwback Video) सलमान खान (Salman Khan) आणि शाहरुख खान (Shahrukh Khan) दिसत आहेत. हा व्हिडिओ सन २०१६मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सुलतान’ या सिनेमाच्या शूटिंग सेटवरील आहे. या सिनेमाने प्रदर्शित होताच बॉक्स ऑफिसवर ५०० कोटीहून अधिक रुपयांची कमाई केली होती. अशात या व्हिडिओवर चाहत्यांनी स्तुतीसुमने उधळली आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood) 

सलमान आणि शाहरुखचा व्हिडिओ
समोर आलेल्या या व्हिडिओत दिसते की, शाहरुख खान सलमान खान याच्या सिनेमाच्या सेटवर पोहोचला आहे. यादरम्यान सलमान शूटिंगमध्ये व्यस्त असतानाच तिथे अचानक शाहरुख येतो. त्याला पाहून संपूर्ण टीम हैराण होते. किंग खान आणि दबंग खान यादरम्यान एकमेकांची गळाभेट घेतात. या व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला दिसते की, अनुष्का शर्माही दिसत आहे. दोन दिग्गज कलाकारांना एकाच सेटवर पाहून चाहतेही खुश झाले.

दोघांच्या बाँडिंगला चाहत्यांकडून भरभरून प्रेम
हा व्हिडिओ पाहून असे दिसते की, सलमान यादरम्यान कोणत्यातरी गाण्याची शूटिंग करत होता. व्हिडिओत सलमान आणि शाहरुखचे एक्सप्रेशन्स पाहण्यासारखे आहेत. दोघांमध्ये जबरदस्त बाँडिंग पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओला चाहते भरभरून प्रेम देत आहेत.

शाहरुख आणि सलमान दिसणार आगामी सिनेमात
शाहरुख खान आणि सलमान खान यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केले आहे. आता ते आगामी ‘पठाण’ या सिनेमातही एकत्र झळकणार आहेत. खरंतर हा शाहरुखचा सिनेमा आहे. या सिनेमात सलमान पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारताना दिसू शकतो. दुसरीकडे, सलमानही ‘कभी ईद कभी दिवाली’, ‘टायगर ३’, ‘गॉडफादर’, ‘किक २’ आणि ‘बजरंगी भाईजान २’ यांसारख्या सिनेमात झळकू शकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

वैवाहिक आयुष्यात आयुष्मान खुराना नाही सुखी म्हणाला ‘लग्न माझ्या आयुष्यातील मोठी चूक’

‘जवळच्या व्यक्तिनेच बालपणी लैंगिक शोषण केले होते’ अभिनेत्रीने केला धक्कादायक खुलासा

‘लोकलमध्ये माझ्यावर अत्याचार झाला होता’ मुंबई मेट्रो सुरू करण्याबाबत बोलताना रवीना टंडनने केला धक्कादायक खुलासा

हे देखील वाचा