Sunday, July 14, 2024

अभिनेता किरण माने प्रकरणाला नवे वळण, पत्नीची महिला आयोगाकडे तक्रार; म्हणाली, ‘…हा अन्याय आहे’

सध्या महाराष्ट्रात अभिनेता किरण माने प्रकरण चांगलंच गाजतंय आहे. स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून तडकाफडकी काढल्याने किरण माने आणि स्टार वाहिनी हा वाद सुरू झाला होता. यासंबधी आता रोज नवनवीन खुलासे होताना आहेत. या सगळ्या प्रकरणावर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. अनेकांनी किरण मानेला पाठिंबा दर्शवत चॅनेलविरुद्ध मोहीम सुरू केली आहे, तर काही लोकांनी किरनवर टीकाही केली आहे. आता या संपूर्ण प्रकरणाला नवीन वळण लागले असून किरणच्या पत्नीनेही या वादात उडी घेत राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

अभिनेते किरण माने (Kiran Mane) हा स्टार प्रवाहवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहेत. तो सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावरून वेगवेगळ्या विषयांवर तो आपले परखड मत व्यक्त करत असतो. अनेकदा ते केंद्रसरकार विरोधात भूमिका मांडतानाही दिसून आले आहेत. याच पाश्वभूमीतर त्याला स्टार वाहिनीने मालिकेतून बाहेर काढले होते. यासंबंधी किरणने आपली भूमिका मांडताना “मी राजकीय भूमिका घेतो म्हणून मला मालिकेतून काढले,” असा धक्कादायक आरोप केला होता. यामुळे हे प्रकरण चांगलेच चर्चेत आले असून किरण मानेच्या पत्नीनेही चॅनेलविरोधात तक्रार दाखल केली आहे.

या तक्रार अर्जात ललिता माने यांनी किरण माने दीर्घकाळ अभिनयक्षेत्रात काम करत असून ते एक पुरोगामी विचारवंत आणि लेखकसुद्धा आहेत, असे लिहिले. “त्यांना अशाप्रकारे कसलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून काढून टाकले आहे. यामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले असून हा एका अभिनेत्यावर झालेला अन्याय आहे,” असेही त्यांनी पुढे लिहिले आहे.

हेही पाहा- अंडरवर्ल्ड डॉनच्या ‘त्या’ फोनने जास्मीनने रातोरात सोडला देश

त्याचबरोबर काम नसल्याने ते मानसिक तणावात असल्याचही त्यांनी या तक्रारीमध्ये म्हणाल्या आहेत. कलाकारांनी राजकीय भूमिका घेतल्याने त्यांना मालिकेतून काढणे ही बाब त्यांच्या वैचारिक व्यक्तिस्वातंत्र्यावर गदा आणणारी असून याबाबत लेखी खुलासा करण्याचे निर्देश मालिकेच्या निर्मात्यांना देण्यात आले आहेत.

दरम्यान मालिकेतील कलाकारांनीही किरण मानेविरोधात भूमिका घेतल्याने तसेच त्यांची सेटवरील वर्तणूक चांगली नसल्याचे मत मांडल्याने हा वाद आणखीणच चिघळला.

हेही वाचा-

हे देखील वाचा