Monday, July 1, 2024

‘आहे दम तुझ्या पार्श्वभागात?…’ ‘या’ कारणामुळे किरण मानेंनी दिले पुष्कर जोगला खुले आव्हान

मागील अनेक दिवसांपासून राज्यभरात मराठा आरक्षणाची चळवळ सुरू आहे. याबाबत आणि कलाकारांनी त्यांची सकारात्मक आणि नकारात्मक मतं देखील दिलेली आहे. याआधी अभिनेत्री केतकी चितळेचे मत मांडले आणि त्यानंतर पुष्कर जोग याने देखील सोशल मीडियावर त्याचा संताप दर्शविला होता. पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी जात विचारली असता त्याला राग आला आणि त्यांनी सोशल मीडियावर वक्तव्य केलं.

या वक्तव्यामध्ये पुष्कर जोग म्हणाला होता की, “सर्वेक्षण कर्मचारी जर बाई माणूस नसत्या तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपया करून मला हा प्रश्न पुन्हा विचारू नका नाहीतर जोग बोलणार नाही डायरेक्ट कानाखाली मारतील.” पुष्करचे हे वक्तव्य ऐकून किरण मानेचा संताप झाला आणि त्याने अभिनेत्याला आव्हान देत एक पोस्ट शेअर केली आहे

यावेळी किरण माने यांनी लिहिला आहे की, ‘आमच्या मनोरंजन क्षेत्रातल्या वर्चस्ववाद्यांना हल्ली उन्माद चढलाय. ”आमचीच सत्ता” हा पोकळ माज आलाय… मी परवाच ‘अजब गजब’ या युट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोललो. दुसर्‍याच दिवशी पुष्कर जोग नावाच्या, सिनेमात वगैरे काम करणार्‍यानं विधान केलं, ”जातगणना करायला आलेली बाई नसती तर मी दोन लाथा घातल्या असत्या”. अरे भावा, ते सरकारनं दिलेल्या आदेशामुळे तुझ्या घरी आलेले साधे कर्मचारी होते रे ते. त्यांना हौस नाही तुमचे उंबरठे झिजवायचे. तुला लाथाच घालायच्यात ना??? लै राग आलाय का तुला जात विचारल्याचा??? …मी तुला चॅलेंज देतो- ज्याने हा जातगणनेचा आदेश सोडलाय त्या नेत्याला लाथा घाल. चल.”

‘खुल्लं आव्हान आहे माझं. तू जर त्या जातगणनेचा आदेश देणार्‍या सत्ताधारी नेत्याला लाथा नाही घातल्यास तर तू त्या कर्मचार्‍याकडून चार लाथा खायच्या. बोल. आहे दम तुझ्या पार्श्वभागात??? अरे या नेत्यांचे पाय चाटणारी जमात तुमची. आडनांव घेऊन डिंग्या मारतोयस? काय घंटा इतिहास आहे तुमच्या आडनांवाचा? असला तरी काय खुट्ट्याला बांधायचाय?? आपलं काम इमानेइतबारे करणार्‍या कर्मचार्‍यांवर कसला माज दाखवतो तू??? हे कर्मचारी जर आपली नोकरी बाजूला ठेवुन तुझ्यासमोर आले ना, तर एका दणक्यात तुझं वाकडं शेपूट सरळ करतील. नाद करू नको गरीबांचा. बुद्धी जागेवर ठेवून बोलत जा. मराठ्यांच्या आणि ओबीसींच्या लढ्यात तू तुझ्या द्वेषाची पोळी भाजून घेऊ नकोस. बहुजन शांत आहेत म्हणून मस्तीत विधानं करणं लै महागात पडेल. मापात रहा’. या पोस्टवर अनेक नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देत किरण मानेंच्या मताशी सहमती दर्शवली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

बिग बॉसनंतर अंकिता लोखंडे आणि आयशा खानचे चमकले नशीब, ‘या’ कास्टिंग डायरेक्टरने दिली थेट चित्रपटाची ऑफर
मुलगा आणि सुनेला फिल्मफेअर अवॉर्ड मिळाल्यानंतर नीतू जल्लोषात; म्हणाली, ‘मला तुमचा अभिमान आहे’

 

हे देखील वाचा