Tuesday, June 25, 2024

“व्यक्तीरेखेचा खून केला होता…” किरण माने यांनी त्यांच्या ‘त्या’ वादावर आधारित शेअर केली सूचक पोस्ट

मराठी टेलिव्हिजन इंडस्ट्रीमधील विवादित अभिनेता म्हणून किरण माने यांना ओळखले जाते. अनेक मराठी मालिका आणि चित्रपटांमध्ये लहान मोठ्या भूमिका करत असताना त्यांना ‘मुलगी झाली हो’ ही मालिका त्यांना मिळाली. या मालिकेमुळे त्यांना खूपच लोकप्रियता मिळाली. मात्र याच मालिकेत काम करत असताना अचानक त्यांच्या सहकलाकारांसोबत वाद सुरु झाला. हा वाद इतका वाढला की, त्यांना मालिकेतून काढण्यात आले. हे प्रकरण तुफान गाजले आणि जनसामान्यांमधून त्यावर विविध प्रक्रिया उमटू लागल्या. कालांतराने प्रकरण शांत झाले आणि किरण माने दुसऱ्या कामात व्यस्त झाले. मात्र आता बऱ्याच महिन्यांनी किरण यांनी यावर एक पोस्ट शेअर केली आहे.

किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले, “…त्यावेळी ही छोटी पण महत्त्वपूर्ण भुमिका माझ्यासाठी लाखमोलाचा आनंद देणारी ठरली होती. वाढती लोकप्रियता डोळ्यांत खुपल्यामुळे काही कारस्थान्यांनी माझ्या डोळ्यादेखत माझ्या ‘विलास पाटील’सारख्या दिलदार, दिलखुलास, रांगड्या व्यक्तीरेखेचा खून केला होता… मी सैरभैर झालो होतो. अन्यायाविरोधात पेटुन उठलो होतो. त्याचवेळी कुठूनतरी एखादा फ़रिश्ता यावा तसा हा ‘हकीमचाचा’ अलगद माझ्याजवळ आला. म्हणाला, “चल दोस्ता, चार पावलं सोबतीनं चालूया…” चार दिवस हकीमचाचा माझ्या शरीरात वास्तव्याला होता… त्यानं नकळत कसली दवा दिली ख़ुदा जाने… माझा मेंदू, माझं मन एकदम शांत झालं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kiran Mane (@kiranmaneofficial)

…’रावरंभा’ सिनेमात रावजी नांवाच्या अनोळखी मावळ्याची ‘अनसुनी दास्तान’ सांगीतलीय… याच मावळ्याला एका बिकट वळणावर हा हकीमचाचा भेटतो.. छत्रपती शिवरायांचा गुप्तहेर, बहिर्जी नाईकांचा चेला… तेज़-नज़र, जिगरबाज वृत्ती असलेला हकीमचाचा जणू काही रावजीलाही म्हणतो, “चल दोस्ता, चार पावलं सोबतीनं चालूया.”
…आणि रावजीला त्याची जान ‘रंभा’ परत मिळवून देतो !

गेस्ट अपिअरन्स असूनही ही भुमिका कायम माझ्या काळजाच्या जवळ राहील. ज्या काळात मी या सिनेमाचं शुटिंग करत होतो त्याकाळात मी आयुष्यातली एक मोठ्ठी लढाई लढत होतो. त्यावेळी त्या लढाईसाठी वेगळंच बळ या चाचानं दिलं मला.”

या पोस्टसोबत त्यांनी त्यांचा नुकताच प्रदर्शित झालेला ‘रावरंभा’ हा सिनेमा देखील पाहण्याचे आवाहन केले आहे. या पोस्टसोबत किरण माने यांनी त्यांच्या या सिनेमातील लुकचा एक फोटो देखील शेअर केला आहे. दरम्यान ते नुकतेच ‘रावरंभा’ या चित्रपटातून ‘हकीमचाचा’ ही भूमिका साकारून प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
हेमा मालिनी यांनी फाेटाे शेअर करत संसद भवनाची दाखवली सुंदर झलक, सांगितली ‘ही’ खास गाेष्ट
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली पलक तिवारी; चाहते म्हणाले, ‘आई जास्त हॉट…’

हे देखील वाचा