Sunday, June 23, 2024

हेमा मालिनी यांनी फाेटाे शेअर करत संसद भवनाची दाखवली सुंदर झलक, सांगितली ‘ही’ खास गाेष्ट

नवीन संसद भवनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी दिल्लीत पोहोचल्या. अशात या खास उद्घाटन साेहळ्यातील त्यांनी अनेक फोटो क्लिक केले आहेत, जे त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फाेटाेंमध्ये अभिनेत्री नवीन संसदेच्या सुंदर भिंतींसोबत पोज देताना दिसत आहे, ज्याचे फाेटाे हेमा मालिनी यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटरवर हॅंडलवरून शेअर केले आहेत.

अभिनेत्री आणि राजकारणी हेमा मालिनी (hema malini) यांनी त्यांचे काही फाेटाे शेअर करत ट्विट केले की, ‘सुंदर नवीन संसद भवनाच्या उद्घाटनाप्रसंगी, जे एका धाडसी नव्या जगात भारताची पावले दाखवेल आणि सर्व प्रगत राष्ट्रांमध्ये आम्हाला स्थान मिळवून देईल. जय हिंद #MyParliamentMyPride.’ या फाेटाेंमध्ये  हेमा मालिनी संसद भवनाच्या पायऱ्यांजवळ आणि सभागृहातील बाकावर बसलेल्या दिसत आहेत. त्याचवेळी, एका फाेटाेत त्या संसदेच्या आत भिंतीजवळ उभ्या असलेल्या दिसत आहेत.

https://twitter.com/dreamgirlhema/status/1662741011536433152?s=20

हेमा मालिनी यांनी फाेटाेंमध्ये दिल्या सुंदर पाेज
आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी संसद भवनामधील आणखी काही फोटो शेअर केले आहेत. या फाेटाेंमध्ये अभिनेत्री संसद भवनाच्या आतील भिंतींवर सुंदर पेंटिंग्ज आणि डिझाइनसह पोज देताना दिसत आहेत. हे फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, ‘सुंदर डिझाइन केलेल्या इमारतीचे आणखी फोटो. भिंतींवरील फलक आणि भिंतींमधील चित्रांमध्ये आपले सर्व ऐतिहासिक वैभव दिसून येते. ही संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी ज्या कलाकारांनी खूप मेहनत घेतली, त्या सर्व कलाकारांचे अभिनंदन. पाहण्यासारखे दृश्य आणि निश्चितपणे प्रतीक्षा करण्यासारखे एक दृश्य!’

https://twitter.com/dreamgirlhema/status/1662784329544798208?s=20

तिसर्‍या ट्विटमध्ये स्वत:चे फोटो पोस्ट करत हेमा मालिनी यांनी लिहिले की, ‘एक उंच कांस्य कोरलेला फलक समुद्रमंथनाचे चित्रण करतो.’

https://twitter.com/dreamgirlhema/status/1662787002771857408?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1662787002771857408%7Ctwgr%5E37c2be10608c9abeb8c8ad1e2b8a153f45269cc5%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fhema-malini-shares-her-photos-with-new-parliament-building-from-inauguration-day-2418965

मंडळी, 28 मे 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले आहे. या संदर्भात, नेत्यापासून अभिनेत्यापर्यंत सर्वजण अभिनंदन करणारे ट्विट करत आहेत, ज्यामध्ये शाहरुख खान, अक्षय कुमार, रजनीकांत, सोनू सूद इत्यादी दिग्गज कलाकरांचा समावेश आहे.(bollywood actress hema malini shares her photos with new parliament building from inauguration day )

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही नक्की वाचा-
“जेव्हा कागद पेन नसते, तेव्हा काही…” अभिनेत्री केतकी चितळेची ‘ती’ पोस्ट झाली व्हायरल
बिकिनी घालून स्विमिंग पूलमध्ये उतरली पलक तिवारी; चाहते म्हणाले, ‘आई जास्त हॉट…’

हे देखील वाचा