Friday, April 25, 2025
Home मराठी ‘नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास…’ या अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मांडले मत

‘नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास…’ या अभिनेत्याने मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर मांडले मत

अभिनेता किरण माने (kiran mane) हा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असतो. समाजातील अनेक घडामोडींवर तो त्याचे प्रामाणिक मत व्यत्क्त करत असतो. यामुळे अनेक वेळा त्याला ट्रोल देखील केले जाते. तरी देखील तो त्याचे मत मांडत असतो. अशातच राजकीय पटलावर अनेक घडामोडी घडताना आपण पाहत आहोत. महाविकास आघाडी एका मागून एका संकटाला सामोरे जात आहे. अशातच बुधवारी (२२ जून) रोजी लाईव्ह येऊन जाणतेहसी संवाद साधला आणि विरोधी पक्षाला तसेच आमदारांना काही गोष्टी सांगितल्या.यानंतर आता किरण मानेने त्यांच्या या वक्तव्यावर त्याचे मत मांडले आहे. जे सध्या सिनेसृष्टीत जोरदार व्हायरल होत आहे.

त्याने त्याच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट केली आहे. त्याने लिहिले आहे की, “अतिशय आत्मविश्वासाने आणि मनापासून बोलले. एवढं घडूनही कूल आहेत हे लय भारी. सत्तेसाठी तडफडणाऱ्या आक्रस्ताळेपणा करणार्‍या नेत्यांच्या तुलनेत हा बाणेदारपणा लयच भावला. सत्ता बळकावणार्‍याला नाही, तर नीच वृत्तीपुढं न झुकणार्‍याला इतिहास लक्षात ठेवतो.”

किरण मानेची ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे. अनेकजण या पोस्टवर त्यांच्या प्रतिक्रिया देत आहेत. काहींना त्याचे हे म्हणणे पटले आहे तर काहींनी मात्र त्याला विरोध दर्शवला आहे. परंतु तो कधीच्या गोष्टींकडे जास्त लक्ष देत नाही. त्याला वाटेल ते आणि पटेल ते तो व्यक्त करत असतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा