Sunday, June 4, 2023

‘काडीचीबी चूक नसताना उमद्या पोरानं तुरूंगवास सोसला; शाहरूख, लब्यू भावा’, किरण मानेंची पोस्ट प्रचंड चर्चेत

काही महिन्यांपूर्वी शाहरुख खानचा (shahrukh khan) मुलगा आर्यन खान (aryan khan) अंमली पदार्थ प्रकरण चांगलेच गाजले होते. क्रूझ पार्टीमध्ये त्याच्याकडे अंमली पदार्थ सापडले आहे. अशीबातमी आली होती. जवळपास १ महिना त्याला तुरुंगवास भगवा लागला आहे. या दरम्यान शाहरुख खानला देखील खूप त्रास सहन करावा लागला आहे. परंतु नुकतेच न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली आहे. त्याच्याकडे कोणतेही पदार्थ नव्हते असे सांगितले आहे. यानंतर आताशाहरुख खानचा जबर फॅन असणाऱ्या किरण मानेने (kiran mane)त्यांच्या समर्थनार्थ पोस्ट केली आहे. त्याने फेसबुकवर शेअर केलेली ही पोस्ट संध्या जोरदार चर्चेत आहे.

किरण मानाने लिहिले आहे की, “…ह्येला म्हन्त्यात ‘हारकर जीतनेवाला बाज़ीगर’ ! नादखुळा. जबराट. पठ्ठ्या कायद्यानं लढला आन् पोराला न्याय मिळवून दिला. “आर्यन खानकडं ड्रग्ज नव्हतेच, त्याच्या व्हाॅट्सॲप चॅटमध्येही काही आक्षेपार्ह सापडलं नाही. तो निर्दोष होता. त्याच्यावरील कारवाई संशयास्पद आहे.” हे काल एनसीबीकडनं अधिकृतरीत्या जाहीर झालं. कितीबी मोठ्ठं संकट आलं..कटकारस्थान करणारा कितीबी बलाढ्य असला.. तरी एक सच्चा कलावंत कधी झुकत नाही. त्रास सहन करतो पण न्याय मिळवतोच, हे किंग खाननं जगाला दाखवून दिलं. आपल्या आसपास पायचाटू, लाळघोट्या सुमार कलाकारांची सद्दी असताना शाहरूख खानसारख्या ताठ कण्याच्या कलावंताचं मोल लाखपटींनी वाढतं भावांनो !”

फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा

त्याने पुढे लिहिले की, “आता आर्यनला पकडून सनसनाटी निर्माण करनार्‍या त्या अधिकार्‍याला काय म्हनायचं भावांनो? कशाचाच पत्ता नसताना, व्हाॅटस् ॲप फाॅर्वर्ड वाचून अशा भ्रष्ट, नीच अधिकार्‍याला ‘सिंघम सिंघम’ म्हनत डोक्यावर घिवून नाचनारी येडी ह्यातनं काय शिकनार का? त्या बेगडी सिंघमला अंतर्गत चौकशी होऊन नोकरी सोडावी लागली. अवैध मार्गानं करोडोंची माया जमवन्याच्या, बियर बारचा मालक असन्याच्या आणि जातधर्म लपवून फसवनूक केल्याच्या लै आरोपांच्या चौकशीला तो तोंड देतोय. तो निर्दोष आसंल तर त्यालाबी क्लीन चीट मिळावी हीच प्रार्थना. त्यालाच काय, कायद्यानं दोषी नसंल, तर केतकी चितळेलाबी न्याय मिळावा. आम्ही ‘सूडबुद्धीनं’ नाय, तर मानूसकीच्या भावनेतनं इचार करतो. भारताचं संविधान सर्वश्रेष्ठ हाय असा आमचा ठाम इश्वास हाय !”

याबाबत किरण माने पुढे लिहितो की, “हिकडं काडीचीबी चूक नसताना तब्बल २८ दिवस जवान, उमद्या पोरानं तुरूंगवास सोसला. स्वातंत्र्यसैनिकाचा वारसा असनार्‍या, आपल्या संपत्तीतला मोठा वाटा ॲसीडग्रस्त महिलांचं आयुष्य सावरन्यासाठी आनि अनेक सामाजिक कामासाठी खर्च करनार्‍या त्याच्या बापानं विनाकारन अतोनात शिव्या, ट्रोलींग, बदनामी सहन केली. त्यावेळी त्याला आणि घरात त्याच्या बायको-मुलीला किती मानसिक त्रास झाला आसंल? त्या कुटूंबाची किती भावनिक घुसमट झाली आसंल? त्या तरण्याबांड पोराची ‘आतनं’ किती पडझड झाली आसंल?? या सगळ्याचा ‘माणूस’ म्हणून आपन इचार करनार का? का आपल्या घरापर्यन्त अशा गोष्टी येईपर्यन्त आपण मूग गिळून गप्प बसायचं ?”

पुढे लिहिले आहे की, “रिया चक्रवर्तीपास्नं आर्यन खानपर्यन्त अनेक निरपराध लोकांना ‘मिडीया ट्रायल’ चालवून आरोपी ठरवलं जातंय. सहज वेळ आसंल तवा युट्यूबवर जाऊन यासंदर्भातल्या बातम्या बघा. लै जुनं नाय हे. खोट्या अफवा पसरवनारी व्हाॅटस् ॲप फाॅर्वर्ड वाचून आन् न्यूज चॅनलवरून पिकवल्या जानार्‍या कंड्या बघून, डोकी फिरवून घेणं आतातरी थांबवा भावांनो. खोटी ‘बदनामी’ हे या पाताळयंत्री लोकांचं हुकमी अस्त्र हाय.. समजून घ्या. हज्जारो वर्षांपास्नं विरोधकांना या जाळ्यातच अडकवत आलेत हे. ‘आमचा विरोध कराल तर बदनाम करू.’ असा संदेश द्यायचा असतो यांना. त्या बदनामीच्या भितीच्या चिंध्या करून निडरपने पुढं जानारा वाघ एखादाच असतो.. मग त्यो त्या बांडगुळांच्या बापाच्याबी सापळ्यात सापडत नाय ! शाहरूख, लब्यू भावा.”

अशाप्रकारे त्याने त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. किरण मानेहा नेहमीच त्यांच्या अशा वादग्रस्त पोस्टमुळे चारवंजेत असतो. मागील काही दिवसांपूर्वी त्याला मुलगी झाली हो या मालिकेतून काढण्यात आले आहे. त्यावेळी देखील मोठ्या प्रमाणात आक्रोश झाला होता.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हे देखील वाचा