Friday, April 18, 2025
Home कॅलेंडर ‘मी तुमच्यासोबत गाणार नाही’, लता दीदींच्या ‘त्या’ वाक्याने दुखावले होते किशोर कुमार

‘मी तुमच्यासोबत गाणार नाही’, लता दीदींच्या ‘त्या’ वाक्याने दुखावले होते किशोर कुमार

बॉलिवूडचे एव्हरग्रीन सिंगर किशोर कुमार (kishor kumar) यांचा ४ ऑगस्टला जन्मदिन असतो. अभिनय आणि गायन याव्यतिरिक्त किशोर कुमार यांचे मजेशीर किस्से खूप प्रसिद्ध आहेत. चला तर जाणून घेऊया किशोर कुमार यांच्या आयुष्याची संबंधित काही किस्से…

आज किशोर कुमारचा ९३ वा वाढदिवस आहे. किशोर कुमारने त्याच्या आयुष्यात सुमारे १६,००० चित्रपट गाणी गायली, त्याशिवाय त्यांना ८ वेळा फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाला आहे . हिंदी चित्रपटसुष्टीमध्ये मंत्रमुग्ध करणाऱ्या आवाज म्हटले की, पहिलं नाव किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचे आहे. दोन्ही महान गायक मध्य प्रदेशच्या भूमीतून बाहेर आले आहेत. किशोर कुमार जो अनेक दशकांपासून वेगवेगळ्या गायन शैलीसाठी ओळखला जातो. बरेच गायक हिंदी सिनेमात आले आणि गेले, परंतु किशोर कुमारच्या आवाजाची जादू आजही आहे. परंतु फारच थोड्या लोकांना हे माहित आहे की अशी एक वेळ आली जेव्हा लता मंगेशकरने किशोर कुमारबरोबर गाण्यास नकार दिला.

यामागील खरं कारण म्हणजे किशोर कुमारची चेष्टा करण्याची सवय होती. किशोर कुमार यांच्या विनोदाच्या सवयीमुळे लता दीदी खूप नाराज होती. लता दीदी किशोर कुमारच्या विनोदाच्या सवयीमुळे कंटाळलेल्या होत्या. खरं तर, काही काळापूर्वी प्रसिद्ध गीतकार समीर अंजान कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा शो’ (the kapil sharma show) यामध्ये आला होता. जिथे त्याने लता मंगेशकर (lata mangeshkar) आणि किशोर दा यांच्याशी संबंधित हा मजेदार प्रसंग सांगितले. समीर म्हणाला की, एकेकाळी लता दीदीने किशोर कुमारबरोबर गाणे बंद केले होते. यामागचे कारण म्हणजे किशोर कुमारचे विनोद करण्याची सवय होती. कारण किशोर कुमार बोलत बोलत विनोद करायचे . त्यांचे ते विनोद ऐकून लता मंगेशकर खूप हसत होत्या. यामुळे त्याचा आवाजामध्ये थकला जाणवायचा आणि किशोर कुमार गाणी गाऊन निघून जायचे. हे पाहून लता मंगेशकर इतक्या रागावली की ती म्हणाली की, ‘त्याला गाऊ द्या, मी त्यांच्याबरोबर गाणार नाही’.

कसा होता चित्रपटाचा प्रवास
किशोर कुमार यांनी १६ हजार चित्रपटामध्ये गाणी गायली आहेत. त्यांना ८ वेळा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे. किशोर कुमार यांच्या चित्रपटाची कारकीर्द १९४६ मध्ये ‘शिकारी’ या चित्रपटापासून अभिनेता म्हणून सुरू झाली. १९७० ते १९८७ या दशकातील सर्वात महागडे गायक होते. किशोर कुमार यांनी अमिताभ बच्चन, राजेश खन्ना, जितेंद्र यासारख्या मोठ्या दिग्गज कलाकारांना आवाज दिला होता.

किशोर कुमार आणि लता मंगेशकर यांचे आवडते गाणे
१९४८ में कौन आया रे (जिद्दी) हे गाणं पहिल्यादाचं लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांनी एकत्र गायले होते. त्याचवेळी, लता मंगेशकर आणि किशोर दा यांच्या आवडत्या गाण्यांवर चर्चा करताना म्हणाले की, त्याच्या आवडत्या गाण्यांमध्ये कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना और चिंगारी कोई भड़के (अमर प्रेम), मेरे सामने वाली खिड़की में (पड़ोसन) हे गाणी आहेत.

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध गायक किशोर कुमार यांचा जन्म ४ ऑगस्ट १९२९ रोजी मध्य प्रदेशातील खंडवा जिल्ह्यात झाला. किशोर कुमार यांचे खरे नाव आभास कुमार होते. पण, त्यांना खरी ओळख मिळाली ती फक्त त्यांच्या ऑन स्क्रीन किशोर कुमार नावाने! किशोर कुमार हे त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगले व्यक्ती होते आणि त्याच वेळी अविभाज्य प्रतिभेने समृद्ध होते. किशोर कुमार यांचे व्यावसायिक जीवन जितके यशस्वी होते, तितकेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही तितकेच गोंधळलेले होते. किशोर कुमार यांचे एकूण चार विवाह झाले.त्यांचे पहिले लग्न रुमा घोष, दुसरे लग्न मधुबाला, तिसरे लग्न योगिता बाली आणि चौथे लग्न लीला चंदावरकर यांच्याशी झाले. १९८९मध्ये त्यांचे निधन झाले. आयुष्याच्या शेवटच्या वेळी त्यांनी खंडवा येथे जावे अशी त्यांची मनापासून इच्छा होती. म्हणूनच, त्याच्या मृत्यूनंतर, मृतदेह मुंबईहून खंडवा येथे आणला गेला आणि तिथे अंत्यसंस्कार करण्यात आले. किशोर कुमार आज आपल्यासोबत नसले तरी, त्यांच्या आठवणी लोकांच्या हृदयात कायम जिवंत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक वाचा-

राखी सावंतच्या बॉयफ्रेंडला मिळाली जीवे मारण्याची धमकी; भडकलेली राखी म्हणाली, ‘प्रेम करणं चूक आहे का?’

वयाच्या १२ व्या वर्षीच करीना आमिरला करायची ‘तसले’ इशारे, अभिनेत्याने केला मोठा खुलासा

सहाय्यक अभिनेता म्हणून अरबाज खानने केलेली करिअरला सुरुवात, भावाच्या साथीने गाठले यशाचे शिखर

हे देखील वाचा