Saturday, April 19, 2025
Home कॅलेंडर काय सांगता राव? किशोर कुमार यांना वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत मोठा भाऊ असल्याचं माहिती नव्हतं; अशी झाली ओळख

काय सांगता राव? किशोर कुमार यांना वयाच्या चौथ्या वर्षापर्यंत मोठा भाऊ असल्याचं माहिती नव्हतं; अशी झाली ओळख

बॉलिवूड जगतात असे अनेक कलाकार आहेत, ज्यांच्या बालपणी काही मजेदार किस्से घडलेले आहेत, ज्याची आपण कल्पनाही करु शकत नाही. त्यातीलच एक नाव म्हणजे किशोर कुमार. किशोरजी हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असं नाव आहे, ज्यांना सर्वोत्कृष्ट  गीतकार, संगीतकार, अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते म्हटलं जात होतं.

मध्य प्रदेशात जन्मलेल्या किशोर कुमार यांच्या आयुष्यात क्रमांक ‘४’ या आकड्याला खूप महत्वाचा आहे.४ ऑगस्ट रोजी जन्मलेले चार बहिण-भावांमध्ये ते चौथ्या क्रमांकावर होते, आणि योगायोगाने त्यांनी आपल्या आयुष्यात विवाह देखील ४ केले आहेत.

किशोर कुमार यांनी रूमा देवी यांच्याशी पहिले, मधुबाला यांच्याशी दुसरे, योगिता बाली यांच्याशी तिसरे तर चौथे लीना चंद्रवरकर यांच्याशी लग्न केले होते.

https://www.instagram.com/p/CNphfCJB0Bq/?utm_source=ig_web_copy_link

जेव्हा त्यांचा मोठा भाऊ अशोक कुमार यांना अभ्यासासाठी बाहेरगावी जावे लागले होते. यामुळे त्यावेळी किशोर कुमार यांना असे वाटायचे की, आपण तीनच भावंडे आहोत. जेव्हा ते ४ वर्षांचे होते, तेव्हा अशोक कुमार सुट्टीच्या दिवशी घरी आले होते. त्यावेळी किशोर यांना आपल्या मोठया भावाचा जणू विसर पडला होता.

अशा प्रकारे, जेव्हा मोठा मुलगा अनेक वर्षांनंतर घरी आला, तेव्हा त्यांची आई त्यांच्यावर प्रेम करू लागली. आईने मोठ्या प्रेमाने खीर बनवली होती. आणि एक मोठी कटोरी भरून अशोक यांच्यासमोर ठेवली होती .

खीर किशोर कुमार यांनाही खुप आवडाची. आईचे असे वागणे पाहून, किशोर कुमार यांनी रागाने विचारले, ‘आई, हा हट्टा-कट्टा कोण आहे ?तु, आता तू माझ्यावर कमी प्रेम करतेस का?’ हे ऐकून त्यांची आई म्हणाली कि बाळा, हा तुझा मोठा भाऊ अशोक आहे.

https://www.instagram.com/p/CM9xz2dhnJ_/?utm_source=ig_web_copy_link

त्यानंतर अशोक यांनी धाकट्या भावाला जवळ बोलावले, आणि किशोर कुमार यांना मिठी मारली. त्यानंतर या दोघांमध्ये एक नाते निर्माण झाले. त्या दिवशी किशोर कुमार यांना समजले, की ते तीन नाही तर चार बहिण -भाऊ आहेत.

हे देखील वाचा