Wednesday, July 3, 2024

किशोर कुमारांची चार लग्नं अन् आईपासून घटस्फोटावर मुलगा अमित कुमारचं वक्तव्य, जाणून घ्या काय म्हटलंय?

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि गायक किशोर कुमार (Kishore Kumar) त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असायचे. त्यांनी आयुष्यात अनेक चढउतार पाहिले. किशोर कुमार यांनी एक-दोन नव्हे, तर चार विवाह केले होते. त्यांनी रुमा गुहा, मधुबाला (Madhubala), योगिता बाली (Yogita Bali) आणि लीना चंदावरकर (Leena Chandavarkar) यांच्याशी लग्न केले. किशोर कुमार यांचा गायक मुलगा अमित कुमार (Amit Kumar) याने त्यांच्या चार लग्नांवर प्रतिक्रिया दिली आहे. किशोर यांच्या पत्नी रुमा गुहा यांचा तो मुलगा आहे. 

‘वडील हे कौटुंबिक पुरुष होते, त्यांना चुकीचे समजले गेले’
मीडिया हाऊसला दिलेल्या मुलाखतीत अमितला त्याचे वडील किशोर कुमार यांच्या चार लग्नांबद्दल त्याची प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा तो म्हणाला, “मी त्यांना कधीच याबद्दल विचारले नाही. हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य होते. त्यांना नेहमीच कुटुंब हवे होते. ते कौटुंबिक पुरुष होते. पण त्यांना चुकीचे समजले गेले.” (kishore kumar son amit reaction on his father’s four marriage)

पहिल्या घटस्फोटानंतर किशोर कुमारने केला घोटाळा
अमित कुमारची आई रुमा बंगाली गायिका आणि अभिनेत्री होती. किशोर कुमारसोबतचे तिचे लग्न १९५०-५८ पर्यंत टिकले. रुमापासून घटस्फोट घेत असतानाच ते मधुबालाच्या प्रेमात पडले. किशोर कुमार यांच्या पत्नी लीना चंदावरकर यांच्यापासून त्यांना सुमित कुमार हा दुसरा मुलगा आहे. मुलाखतीदरम्यान, जेव्हा अमितला विचारले गेले की किशोर कुमार त्यांच्या भूतकाळातून कसे सुटू शकले? तेव्हा ते म्हणाले, “माझ्या पालकांचा घटस्फोट झाला, त्या दिवशी त्यांनी बंगल्यात त्यांची मॉरिस मायनर कार जाळली. नायक म्हणून ‘आंदोलन’ हा पहिला चित्रपट केल्यानंतर, त्यांनी माझ्या आईसोबत ती विकत घेतली होती. असे होते किशोर कुमार.”

रुमा गुहा यांना गृहिणी बनवू इच्छित होते किशोर कुमार
अमितची आई रुमा या प्रसिद्ध चित्रपट निर्माते सत्यजित रे यांच्या भाची होत्या. किशोर कुमार आणि रुमा यांनी १०५० मध्ये लग्न केले. दोन वर्षांनी अमित झाले. रुमाने करिअर सोडून गृहिणी व्हावे अशी किशोर यांची इच्छा होती, असे सांगितले जाते. अमिताभ आणि जया बच्चन यांची भूमिका असलेला ऋषीकेश मुखर्जीचा ‘अभिमान’ हा चित्रपट किशोर आणि रुमाची कथा असल्याचे मानले जाते. रुमाने दिलीप कुमार यांचा पहिला चित्रपट ‘ज्वार भाटा’, ‘अफसर’ आणि ‘मशाल’ यांसारख्या चित्रपटात काम केले. किशोर कुमारपासून वेगळे झाल्यानंतर रुमाने पुन्हा लग्न केले. त्यांना दोन मुले होती. २०१४ मध्ये वयाच्या ८४ व्या वर्षी कोलकाता येथे त्यांचे निधन झाले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

हे देखील वाचा