प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री किश्वर मर्चंट आणि तिचा पती सुयश राय यांनी अलीकडेच त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आहे. त्यांच्या मुलाचा जन्म २७ ऑगस्ट रोजी झाला. किश्वर आणि सुयश जन्माष्टमीच्या दिवशी आपल्या मुलाला घरी घेऊन आले. या जोडप्याने आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून आपल्या मुलाचे नाव सर्वांना सांगितले आहे. या व्हिडिओमध्ये जोडप्याचे संपूर्ण कुटुंब दिसत आहे.
किश्वर-सुयशने त्यांच्या मुलाचे नाव ‘निर्वैर’ ठेवले आहे. ‘निर्वैर’ नावाचा अर्थ ज्याला कोणताही शत्रू नाही. व्हिडिओ शेअर करताना सुयशने लिहिले की, “हॅलो वर्ल्ड. निर्वेर रायला भेटा. मी पुन्हा पुन्हा सांगत आहे की, ही सर्वात सुंदर भावना आहे, ज्याचा मी अनुभव घेतला आहे. तुम्ही मला खास बनवलं आणि मला आशीर्वाद दिल्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे.”
त्याचवेळी, किश्वरने लिहिले की, “निर्भय आईचा निर्वेर मुलगा. हॅलो वर्ल्ड.” तसेच व्हिडिओमध्ये, किश्वर आणि सुयश मुलाला हातात घेऊन उभे राहिलेले दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांचे संपूर्ण कुटुंबही व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये सर्वांच्या चेहऱ्यावर प्रचंड आनंद दिसत आहे. तसेच बाळाचे नाव ठेवताना सर्वजण आनंदाने कार्यक्रम साजरा करताना दिसत आहेत.
किश्वर आणि सुयश यांचे लग्न २०१६ मध्ये झाले होते. दोघेही बाॅलिवूड इंडस्ट्रीत आहेत. त्यांची पहिली भेट देखील शूटिंग सेटवरच झाली होती. दोघांच्या वयात ८ वर्षांचे अंतर आहे, पण या अंतरामुळे नात्यात कधीच अडथळा निर्माण झाला नाही. २०१० सालापासून सुयश आणि किश्वर रिलेशनशिपमध्ये होते. २०१५ सालाी त्यांनी ‘बिग बॉस’च्या नवव्या पर्वात भाग घेतला होता. २०१६ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली. यावर्षी मार्च महिन्यात किश्वरने गरोदर असल्याची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती.
दोघांच्या लग्नाला ४ वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. जून महिन्यातच, किश्वर मर्चंटचा ‘बेबी शॉवर’ सोहळा आयोजित करण्यात आला होता. ज्यात बाॅलिवूड इंडस्ट्रीतील विशेष मित्रांनाही किश्वर आणि सुयश यांनी आमंत्रित केले होते. ज्याचे काही सुंदर फोटो सोशल मीडियावर खूप धुमाकूळ घालत होते.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…