Thursday, November 21, 2024
Home कॅलेंडर KK Death | पंचतत्त्वात विलीन झाला मखमली आवाज, मुलगा नकुलने दिला मुखाग्नी

KK Death | पंचतत्त्वात विलीन झाला मखमली आवाज, मुलगा नकुलने दिला मुखाग्नी

आपल्या मखमली आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकणारे प्रसिद्ध गायक केके (KK) पंचतत्त्वात विलीन झाले आहेत. नुकतेच कोलकाता येथे एका कॉन्सर्ट दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला होता. केके यांच्या निधनामुळे संगीत आणि चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. सर्वजण या ज्येष्ठ गायकाची आठवण काढत आहेत आणि त्यांच्याशी संबंधित आठवणीही शेअर करत आहेत. गुरुवारी (२ जून) दुपारी मुंबईतील वर्सोवा येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

केके यांचा मुलगा नकुल याने त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यावेळी केके यांना अखेरचा निरोप देण्यासाठी संगीत आणि चित्रपट जगतातील अनेक सेलिब्रिटी आले होते. श्रेया घोषाल, शान, जावेद अख्तर, संजय लीला भन्साळी यांच्यासह अनेक स्टार्स स्मशानभुमीत पोहोचले. अनेक गायकांनी त्यांच्याशी संबंधित अनेक आठवणी शेअर केल्या आहेत. (kk funeral late singer last rites were performed by his son nakul at versova hindu cemetery)

केकेने अनेक गायकांसोबत उत्तम गाणी गायली. ३१ मे रोजी कोलकाता येथे एका कॉन्सर्टनंतर केके यांचे निधन झाले. ते ५३ वर्षांचे होते. त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना रुग्णालयात नेले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. केकेने त्यांच्या कारकिर्दीत २०० हून अधिक गाण्यांना आवाज दिला होता. त्यांनी गायलेले प्रत्येक गाणे लोकप्रिय झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गायकाचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला. अहवालात ‘मायोकार्डियल इन्फेक्शन’चाही उल्लेख आहे, ज्यामुळे केके यांच्या हृदयातील रक्त पंपिंग थांबले असावे. नाव न सांगण्याच्या अटीवर पोस्टमार्टम करणाऱ्या एका डॉक्टरने वृत्तसंस्थेला सांगितले की, “त्यांच्या डाव्या मुख्य कोरोनरी धमनीमध्ये मोठा Blockage होता, तर इतर विविध धमन्या आणि उप-धमन्यांमध्येही लहान Blockage होता. लाइव्ह शो दरम्यान अतिउत्तेजनामुळे रक्तप्रवाह थांबला, ज्यामुळे हृदयाचे ठोके बंद झाले आणि त्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा