Thursday, June 13, 2024

सर्जनशील भूमिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या दिलीप प्रभावळकर यांच्या कुटुंबाविषयी ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

दिलीप प्रभावळकर हे नाव माहित नसलेला मनुष्य या जगात शोधूनही सापडणार नाही. त्यांच्यात असणारा प्रतिभावान आणि गुणी कलाकार प्रत्येक प्रेक्षकाला नेहमीच भावतो. मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये त्यांनी अतिशय उत्तमोत्तम भूमिका साकारत प्रेक्षकांची मने जिंकली. कॉमेडी, खलनायक, चरित्र, गंभीर, आक्रमक अशा जवळपास सर्वच प्रकारच्या भूमिका त्यांनी अगदी लीलया साकारल्या आणि सर्वांची वाहवा मिळवली. मालिका, चित्रपट, नाटकं या सर्वच माध्यमातून काम करत त्यांनी स्वतःला उत्तम अभिनेता म्हणून सिद्ध केले.

दिलीप प्रभावळकर (Dilip Prabhavalkar) यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर टीसीएफ या औषध कंपनीमध्ये काम करण्यास सुरुवात केली. अनेक वर्ष नोकरी करत असताना त्यांनी हळूहळू छबिलदासमधून बालरंगभूमीवर आणि प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांचा अभिनयाचा प्रवास व्यावसायिक रंगभूमी, दूरदर्शन मालिका आणि चित्रपटांपर्यंत पोहोचला.

‘चिमणराव’ या मालिकेद्वारे दिलीप प्रभावळकर यांनी छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेमुळे त्यांना अमाप लोकप्रियता मिळाली आणि प्रत्येक घरात ओळखले जाऊ लागले. रंगभूमीवर त्यांनी ‘चेटकी’, ‘नातीगोती’, ‘एक झुंज वाऱ्याशी’, ‘कलम 302’, ‘गुरू’, ‘हसवा-फसवी’ आदी अनेक विलक्षण भूमिका साकारल्या. त्यांनी ‘हसवा-फसवी’चे शेकडो प्रयोग केले. चिमणराव, गंगाधर टिपरे, तात्या विंचू.. अशा अनेक प्रसिद्ध भूमिकांनी तुफान लोकप्रियता मिळाली. आज या लेखातून दिलीप प्रभावळकर यांच्या कुटुंबाबाबत जाणून घेऊया.

नीला हे दिलीप प्रभावळकरांच्या पत्नींचे नाव आहे. त्यांना प्रसिद्धीस येणे आवडत नसल्यामुळे त्या यासर्वांपासुन सतत लांब राहतात. सोशल मीडिया, इंटरनेटवर देखील त्यांचे निवडक आणि मोजकेच फोटो आपल्याला पाहायला मिळतील. दिलीप आणि नीला प्रभावळकर या दाम्पत्याला एक मुलगा असून त्याचे नाव केदार प्रभावळकर आहे. दिलीप प्रभावळकर हे मनोरंजनविश्वातील एवढे मोठे नाव असूनही केदारने करिअरसाठी दुसरेच क्षेत्र निवडले. त्याला देखील त्याच्या आईसारखे प्रकाशझोतात राहणे आवडत नसलायने तो जास्त कुठे दिसत नाही. केदारने 17 डिसेंबर 2013 रोजी सोनल अल्वारिससोबत लग्न केले. सोनल ख्रिश्चन आहे. केदार आणि सोनलचे लग्न महाराष्ट्रीयन पद्धतीने झाले.

अधिक वाचा- 
लोकांच्या घरात झाडू मारण्याचे काम करणाऱ्या शशिकला, नकारात्मक भूमिका साकारून बनल्या आघाडीच्या अभिनेत्री
चाहत्यांनी पाठवलेली पत्र पाहून संकर्षण कऱ्हाडे झाला भावूक; म्हणाला “या सगळ्यांन…”

हे देखील वाचा