अबब! टेलिव्हिजन स्टार दिव्यांका त्रिपाठी आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीण, पाहा तिच्या आलिशान घर अन् गाड्यांची झलक


मनोरंजनसृष्टीमध्ये जर तुमचा जम बसला आणि प्रेक्षकांनी तुम्हाला स्वीकारले, तर बक्कळ पैसे मिळायला सुरुवात होते. यासाठी योग्य वेळ येण्याची आणि तोपर्यंत मेहनत आणि चिकाटीने काम करण्याची तुमच्यात इच्छाशक्ती असावी लागते. लोकांमध्ये एक विचार खूपच ठासून भरला आहे आणि तो म्हणजे फक्त चित्रपटातील कलाकारच श्रीमंत असतात. पण असे बिलकुल नाहीये. चित्रपट क्षेत्रटातील कलाकार नक्कीच श्रीमंत असतात, यात शंका नाही. मात्र, टीव्हीवरील कलाकार देखील काही कमी श्रीमंत नसतात. सिनेसृष्टीतील कलाकारांना टेलिव्हिजनवरील कलाकार कमाईच्या बाबतीत तोडीस तोड आहेत. आता टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वात आघाडीची अभिनेत्री असलेल्या दिव्यांका त्रिपाठीचेच बघा.

दिव्यांका ही आजच्या घडीला टीव्ही क्षेत्ररतील सर्वात महागडी आणि आघाडीची अभिनेत्री आहे. तिने खूप कमी काळात तिच्या अभिनयाने रसिकांच्या मनात आणि या इंडस्ट्रीमध्ये स्वतःची जागा निर्माण केली आहे. दिव्यांका जशी अभिनयात अग्रेसर आहे, तशी ती कमाईच्या बाबतीतही सर्वात पुढे आहे. आज आपण या लेखातून दिव्यांकाच्या एकून कमाई आणि संपत्तीबद्दल जाणून घेणार आहोत.

मूळची भोपाळची असणाऱ्या दिव्यांकाने तिच्या करिअरची सुरुवात एका सौंदर्य स्पर्धेपासून केली होती. या स्पर्धेत ती विजेती तर झाली नाही. मात्र, तिला उत्कृष्ट त्वचेचा पुरस्कार मिळाला. काही काळाने ती झी टीव्हीच्या ‘बनू मैं तेरी दुल्हन’ या मालिकेत दिसली आणि तिचे नशीबच पालटले. या मालिकेने तिला मोठी लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर ती एकता कपूरच्या ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेने तर तिला यशाच्या आणि लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन बसवले. तिने एवढ्या लोकप्रियतेसोबतच सर्वात महाग अभिनेत्री असल्याचे बिरुद देखील मिळवले आहे. एका रिपोर्टनुसार, दिव्यांका एका एपिसोडचे १ ते १.५० लाख रुपये घेते.

दिव्यांकाने तिच्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर तिने २०१९ साली फोर्ब्सच्या खास यादीत स्थान मिळवले आहे. या १०० कलाकारांच्या यादीत ती ७९ व्या स्थानावर होती. माध्यांतील वृत्तानुसार, दिव्यांकाकडे २० कोटी रुपयांची संपत्ती आहे.

दिव्यांकाकडे मुंबईमध्ये एक १२६० स्क्वेअर फूटचा ३ बीएचके फ्लॅट असून त्याचा किंमत जवळपास ४ कोटी रुपये आहे. शिवाय तिला मोठ्या आलिशान गाड्यांची देखील खूप आवड आहे. दिव्यांकाने नुकतीच ५० लाख रुपयांची मर्सिडीज बेंज कार खरेदी केली आहे.

आलिशान घर आणि गाड्यांसोबतच दिव्यांकाकडे अनेक लक्झरी ऍक्सेसरीज आहे. काही महिन्यांपूर्वी तिला एका गुचीच्या हॅन्डबॅगसोबत पाहिले गेले, तेव्हा तिच्याकडे असलेल्या त्या बागेची किंमत २ लाख रुपये इतकी आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘यार गजब आहेस तू’, श्रुती मराठेच्या ग्लॅमरस फोटोंवर चाहत्याची झक्कास कमेंट

-अभिनेत्री शगुफ्ता अलीच्या मदतीसाठी धावला जॉनी लिव्हर; आर्थिक खर्च भागवण्यासाठी विकल्यात घरातील वस्तू

-तापसी पन्नूच्या लग्नासाठी आई- वडील चिंतेत; म्हणाले, ‘आता कोणाशीही लग्न कर…’


Leave A Reply

Your email address will not be published.