झी मराठीवर या वर्षी अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या. यातील सगळ्याच मालिकांनी प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. यातील सध्या ‘मन उडू उडू झालं’ (Man Udu Udu Zala) ही मालिका जोरदार चर्चेत आहेत. मालिकेची कहाणी, पात्र, डायलॉग या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना खास करून पसंत पडत आहेत. मालिकेत मुख्य भूमिकेत अजिंक्य राऊत (Ajinkya Raut) आणि ऋता दुर्गुळे (Hruta Durgule) हे कलाकार आहेत. मालिकेतील सगळीच पात्र सध्या गाजत आहेत. यात इंद्राच्या बहिणीचे म्हणजेच मुक्ताचे पात्र अभिनेत्री प्राजक्ता परब (Prajakta Parab) ही साकारत आहे. अत्यंत मस्तीखोर, बिनधास्त आणि खोडकर मुलीचे पात्र निभावताना ती दिसत आहे.
मालिकेतील मुक्ताचे पात्र चांगलेच लक्षवेधी ठरत आहे. तिच्या विषयी जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. तिच्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक गोष्टी ती सोशल मीडियावर शेअर करत असते. (know about man udu udu zal serial fame muktas personal life)
मालिकेत वेंधळी, मस्तीखोर दिसणारी मुक्ता वैयक्तिक आयुष्यात मात्र खूपच ग्लॅमरस आहे. पारंपारिक तसेच वेस्टर्न लूकमधील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते. प्राजक्ताबाबत एक खास गोष्ट म्हणजे ती याच वर्षी लग्नबंधनात अडकली आहे. तिचा पती देखील अभिनय क्षेत्रातील एक गाजलेले नाव आहे. प्राजक्ता ही दिग्दर्शक आणि लेखक अंकुश मरोडेची पत्नी आहे. त्यांनी दोघांनी या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच ९ जानेवारी २०२१मध्ये विवाह केला आहे. अंकुश हा एक उत्कृष्ट दिग्दर्शक आहे. तो ‘ती परत आलीये’ या मालिकेचे दिग्दर्शन करत आहे.
मराठीसह हिंदीत देखील त्याने काम केले आहे. त्याने ‘सड्डा हक’, ‘लाल इश्क’, ‘ऐसी दीवानगी देखी नहीं कई’ या हिंदी मालिका केल्या आहेत. तो तब्बल ७ वर्ष हिंदी मालिकांमध्ये सहाय्यक अभिनेता म्हणून काम करत होते. त्यानंतर त्याने ‘एक घर मंतरलेलं’ या मालिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. ‘माझ्या मित्राची गर्लफ्रेंड’, ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या मालिकांमध्ये देखील त्याला काम करण्याची संधी मिळाली होती. नुकतेच त्या दोघांचा साखरपुडा झालेला एक वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्त प्राजक्ताने पतीसोबत फोटो शेअर करून त्याला शुभेच्छा दिल्या होत्या.
हेही नक्की वाचा –