बॉलिवूडचे दिग्गज गायक बप्पी लहरी हे सगळ्यांना दुःखाच्या महासागरात बुडवून हे जग सोडून गेले आहे. त्यांच्या निधनाने सगळ्यांना खूप दुःख झाले आहे. ७० ते ८० च्या दशकात त्यांनी हिंदी सिनेसृष्टी गाजवली आहे. मागील २९ दिवसापासून ते रुग्णालयात आहेत. त्यांना मध्यंतरी डिस्चार्ज दिला होता. परंतु त्यांची तब्येत पुन्हा बिघडली आणि त्यांना पुन्हा रुग्णालयात भर्ती केले. अशातच त्यांनी मंगळवारी (१५ फेब्रुवारी) रोजी या जगाचा निरोप घेतला.
बप्पी यांचा विवाह २४ जानेवारी १९७७ रोजी चित्रानी सोबत झाले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलाचे बप्पा लहरी तर मुलीचे नाव रेमा आहे. (Know about singer bappi Lahiri family and relationship)
बप्पा हा एक स्कोर कंपोसर आहे. तो सध्या त्याची पत्नी तनिषासोबत लॉस एंजेलिसमध्ये राहतो. बप्पी नेहमीच त्यांना भेटायला लॉस एंजेलिसला जात असायचे. तसेच त्यांची मुलगी रेमा हिचे देखील लग्न झाले आहे. तिला स्वास्तिक नावाचा एक मुलगा देखील आहे. स्वास्तीकचे इंस्टाग्राम अकाऊंट देखील आहे. त्यावर त्याने लिहिले आहे की, अपकामिंग रॉकस्टार. त्याला देखील त्याच्या आजोबांसारखे गायक व्हायचे आहे. तो बप्पी लहरीसोबत अनेकमध्ये येत असायचा.
त्यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबासोबत त्यांच्या चाहत्यांना देखील खूप दुःख झाले आहे. बप्पी यांची अनेक गाणी अजरामर झाली आहेत. त्यांनी पॉपस्टार म्हणून बॉलिवूडमध्ये नाव कमवले आहे. त्यांच्या गाण्यांना नेहमीच एक वेस्टर्न टच असायचा त्यामुळे तरुण वर्गाला नेहमीच त्यांची गाणी आवडायची.
हेही वाचा :