बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोणत्याही परिचयाची गरज नाही. बॉलीवूडमध्ये बच्चन परिवाराला खूप सन्मान मिळतो. बच्चन परिवाराने आपल्या सशक्त अभिनयाने अनेक दशक हिंदी सिनेसृष्टीवर राज्य केले आहेत, किंबहुना अजूनही करत आहे.
बच्चन परिवार म्हटले की, अमिताभ बच्चन, जया बच्चन, अभिषेक बच्चन, श्वेता बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि आराध्य बच्चन हे आपल्याला माहित आहे. परंतु यांच्या व्यतिरिक्त देखील बच्चन परिवारात सदस्य आहेत, जे लाईमलाइट पासून जरा दूर असतात. आज आपण या लेखातून असच काही माहित नसलेल्या बच्चन परिवारातील सदस्यांना जाणून घेणार आहोत.

लाला प्रताप नारायण श्रीवास्तव आणि सरस्वती देवी हे अमिताभ यांचे आजी आजोबा. यांना चार मुलं झाली. बिट्टन, भगवानदेई, हरिवंश राय आणि शालिगराम. यातील भगवानदेई ह्या हरिवंशराय यांच्या मोठ्या भगिनी तर अमिताभ यांच्या आत्या. भगवानदेई यांना एक मुलगा रामचंदर आणि त्याची पत्नी कुसुमलता हे होते. रामचंदर, कुसुमलता यांना अशोक, किशोर, अनूप, अरुण ही चार मुलं झाली.
त्यानंतर हरिवंशराय बच्चन म्हणजेच हिंदी भाषेतील सुप्रसिद्ध लेखक आणि कवी. त्यांनी दोन लग्न केले. त्यांच्या पहिल्या पत्नीचे नाव होते शामा बच्चन. शामा बच्चन यांना कोणतेही मुलबाळ नव्हते. त्यानंतर हरिवंशराय बच्चन यांनी तेजी बच्चन यांच्याशी लग्न केले.
हरिवंशराय आणि तेजी बच्चन यांना दोन मुले झाली, अमिताभ आणि अजिताभ. अजिताभ हे अमिताभ यांचे लहान बंधू असून त्यांना भीम, नम्रता, नयना, नीलिमा ही चार मुलं.

अजिताभ यांची भारतातल्या मोठ्या उद्योगपतींमध्ये गणना होते. अजिताभ यांची पत्नी रमोला देखील बिझनेस वूमन आहेत. यांच्या मुलांपैकी नयना बच्चन हिने बॉलीवूड अभिनेता कुणाल कपूर सोबत २०१५ साली लग्न केले. भीम हा एक इन्व्हेस्टमेंट बँकर आहे. तो न्यूयॉर्क मध्ये कार्यरत होता, आता मात्र तो भारतात आला आहे. नम्रता ही पेंटर असून दिल्ली, मुंबई सारख्या मोठ्या शहरात तिच्या पेंटिंजचे प्रदर्शन भरत असतात.










