Wednesday, April 17, 2024

तगड्या पगाराची नोकरी सोडून ऑडिशनसाठी अनेक किलोमीटर पायी चालणाऱ्या सानंद वर्मा यांचे ‘या’ शोने बदलवले जीवन

कलाकार वेगवेगळ्या भूमिका करतात मात्र असे खूप कमी वेळा आणि खूप कमी कलाकारांच्या बाबतीत असे घडते की, एखाद्या भूमिकेमुळे त्यांना आयुष्यभराची मोठी ओळख मिळून जाते. टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या कलाकारांच्या बाबतीत तर असे घडताना दिसतेच. टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय आणि प्रसिद्ध कॉमेडी मालिका म्हणजे ‘भाभीजी घर पे हैं’ (Bhabiji Ghar Par Hain). या मालिकेने लोकप्रियतेचे आणि प्रसिद्धीचे शिखर गाठले. सोबतच मालिकेने यात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मोठी ओळख मिळवून दिली. याच मालिकेतील एक लोकप्रिय पात्र म्हणजे अनोखे लाल सक्सेना (Anokhe Lal Saxena). या भूमिकेला लोकांनी तुफान प्रेम दिले आणि ओळख मिळवून दिली. नुसते सक्सेनाजी एवढे म्हटले तरी त्यांना ओळखले जाते. या पात्राला एवढी लोकप्रियता मिळण्यामागे अभिनेते सानंद वर्मा (Saanand Verma) यांनी खूप मेहनत घेतली. त्यामुळे या भूमिकेला मिळणाऱ्या प्रेमाचे श्रेय फक्त त्यांनाच जाते.

यश हे कधीही अगदी सहज मिळत नाही. त्यामागे अतीव मेहनत आणि संघर्ष असतो. आज सानंद वर्मा यांना त्यांच्या कामामुळे मोठी ओळख मिळाली असली तरी काम मिळवण्यासाठी आणि या क्षेत्रात टिकून राहण्यासाठी त्यांना कठीण संघर्ष करावा लागला. या क्षेत्रात येण्यासाठी त्यांनी तगड्या पगाराची नोकरी देखील सोडली. जाणून घेऊया त्यांच्या आयुष्यातील संघर्ष.

सानंद वर्मा (Saanand Verma) हे सुरुवातीपासूनच या क्षेत्रात होते असे नाही. या इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी ते एका मोठ्या मल्टिनॅशनल कंपनीमध्ये काम करायचे. मात्र अभिनयसठ त्यांनी चांगल्या पगाराची नोकरी सोडली आणि या क्षेत्रात एन्ट्री करण्यासाठी थेट मुंबई गाठली. मुंबईत आल्यानंतर त्यांनी त्यांचे काम मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यादरम्यान त्यांच्याकडे घर नव्हते नाही काम. त्यांनी एका औषधांच्या कंपनीमध्ये राहण्यास सुरुवात केली. तिथे खूपच औषधांचा वास यायचा, मात्र तरीही ते राहत होते.

मुंबईमध्ये नवीनच आलेल्या सानंद वर्मा यांनी टीव्हीसाठी ऑडिशन देण्यास सुरुवात केली. जिथे संधी मिळेल तिथे ते ऑडिशसाठी जायचे. यासाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि त्यांना भाभीजी घर पै है या शोमध्ये ‘अनोखे लाल सक्सेना’ ही भूमिका मिळाली. या भूमिकेने त्या आयुष्यभराची मोठी ओळख दिली. आज त्यांना अनोखे लाल सक्सेना म्हणूनच ओळखले जाते.

हेही वाचा :

हे देखील वाचा