Thursday, July 9, 2026
Home बॉलीवूड प्रियंका, दीपिका आणि आलियाच्या पावलावर पाऊल, आणखी एक अभिनेत्री हॉलीवूडमध्ये करतीय एन्ट्री

प्रियंका, दीपिका आणि आलियाच्या पावलावर पाऊल, आणखी एक अभिनेत्री हॉलीवूडमध्ये करतीय एन्ट्री

बॉलीवूड कलाकार हे सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपले नाव गाजवत आहेत. हॉलीवुड मध्ये तर आलिया भट्टने तेथील कलाकारांना आणि चाहत्यांना थक्क केले आहे. प्रियंका चोपडा हॉलीवुड मध्ये नेहमी सक्रिय असते आणि उत्तम अभिनयाने प्रेक्षकांचे मने जिंकली आहेत. तर आता प्रियांका, दीपिका आणि आलिया यांच्या पाठोपाठ, आता आणखी एक अभिनेत्री हॉलिवूडमध्ये आपली छाप पाडण्यासाठी तयार झाली आहे. या अभिनेत्रीचे सौंदर्य उत्तम आहे. आणि तिचा अभिनय हि उत्तम आहे. तर अभिनेत्रीचे नाव म्हणजे दिशा पटानी. दिशा पटानीच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपटाचा, ‘द पोर्टल ऑफ फोर्स’चा ट्रेलर आधीच प्रदर्शित झाला आहे. आणि या ट्रेलरने सोशल मिडियावर आता धुमाकुळ घातला आहे.

‘द पोर्टल ऑफ फोर्स’ या चित्रपटात दिशा (deesha)पटानी हि एका ऍक्शन अवतारात दिसेल. तर या चित्रपटात ती तलवारबाजी करताना दिसेल. तसेच या चित्रपटाची कथा काही प्रमाणात काल्पनिक आणि रहस्यमय शौलीची असणार आहे. ‘स्टेटगार्ड्स व्हर्सेस होलीगार्ड्स’ नावाच्या नवीन चित्रपट मालिकेतील हा पहिला चित्रपट आहे, ज्यात दिशा पटानी एक महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. दिशाचे चाहते तिच्या हॉलिवूड पदार्पणाबद्दल खूप उत्सुक आहेत.

‘द पोर्टल ऑफ फोर्स’मध्ये दिशा पटानी दोन्ही विरोधी गटांशी संबंध असलेल्या एका तरुण स्त्रीची भूमिका साकारेल. तर या चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. दिशा पटानी हि एक लोकप्रिय अभिनेत्री असुन तिने आतापर्यत कल्की, बागी, अश्या उत्तम चित्रपटातुन लोकप्रिय झाली आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा

डॉक्टरकी सोडून अभिनयात केली एन्ट्री; आता भव्य चित्रपट ‘रामायण’चा भाग बनली ही साऊथ स्टार

हे देखील वाचा