अभिनेता सलमान खानला (Salman Khan) नुकतीच जीवे मारण्याची धमकी मिळाली होती. त्याचे वडील सलीम खान (Salim Khan) यांना एक पत्र मिळाले, ज्यामध्ये ‘ सलमानची सिद्धू मुसेवालासारखी अवस्था होणार’ असे लिहिले होते. तेव्हापासून बॉलिवूड स्टार्सची सुरक्षा चर्चेत आली आहे. स्टारडममध्ये सिने स्टार्स त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था कशी करतात, हे प्रत्येकाला जाणून घ्यायचे आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर कलाकारांना अनेक प्रसंगी चाहत्यांना भेटावे लागते, तर कधी सार्वजनिक ठिकाणी शूटिंग करावे लागते. पण यावेळी कोणीतरी असते, जे त्यांच्या सुरक्षेची व्यवस्था करत असते. तेच त्यांचे बॉडीगार्ड. होय, सर्वच स्टार्स त्यांच्या सुरक्षेवर मोठा खर्च करतात. काही स्टार्सचे बॉडीगार्ड त्यांच्याइतकेच प्रसिद्ध आहेत. जाणून घेऊया बॉडीगार्ड्सच्या कमाईबद्दल… (know celebrity bodyguards and their salaries)
सलमान खान- शेरा
जर स्टार्सच्या बॉडीगार्डचा उल्लेख केला, तर सलमान खानच्या पर्सनल बॉडीगार्ड शेराचं नाव सर्वात आधी येतं. काही बॉडीगार्ड अभिनेत्यांना त्यांचे चाहते आणि कुटुंबापेक्षा चांगले ओळखतात. शेरा हा त्यापैकीच एक. तो नेहमीच सलमानसोबत सावलीसारखा असतो. बॉडीगार्ड्सच्या जगात शेराही एखाद्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही. तो जवळपास २८ वर्षांपासून सलमानसोबत आहे. सलमानचा पूर्णवेळ बॉडीगार्ड होण्यापूर्वी शेरा मायकेल जॅक्सन, विल स्मिथ, पॅरिस हिल्टन आणि जॅकी चॅनसह अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींचा बॉडीगार्ड राहिला आहे. तुम्हालाही वाटत असेल की, शेराचा पगार किती आहे? रिपोर्ट्सनुसार, शेरा एका महिन्याचा पगार सुमारे १५ लाख रुपये घेतो. त्याचा वार्षिक पगार सुमारे २ कोटी रुपये आहे.
शाहरुख खान- रवी सिंग
शाहरुख खानचा (Shahrukh Khan) पर्सनल बॉडीगार्ड रवी सिंग आहे. तो चित्रपट प्रमोशन, वाढदिवस आणि सार्वजनिक कार्यक्रमात किंग खानची सुरक्षा करतो. अलीकडेच शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याच्या मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणादरम्यान रवी सिंग देखील चर्चेत आला होता. शाहरुखला संरक्षण देणे सोपे काम नाही. त्यामुळे रवी यासाठी भरमसाठ फी घेतो. रिपोर्ट्सनुसार, शाहरुखचा बॉडीगार्ड रवी सिंग दरवर्षी २.७ कोटी रुपये कमावतो. सर्वात महागड्या बॉडीगार्ड्सच्या यादीत त्याचा समावेश आहे. रवी जवळपास १३ वर्षांपासून किंग खानच्या संरक्षणात तैनात आहे.
अमिताभ बच्चन- जितेंद्र शिंदे
बॉलिवूडचे शेहंशाह अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या पर्सनल बॉडीगार्डचे नाव जितेंद्र शिंदे आहे. अनेकवेळा तो अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या फोटोंमध्ये दिसतो. जुन्या काळातील सर्वात प्रिय आणि प्रसिद्ध अभिनेत्यांपैकी एकाचे संरक्षण करणे खरोखर सोपे काम नाही. मात्र, त्यासाठी त्याला भरघोस रक्कम दिली जाते. जितेंद्र शिंदे याच्या कमाईबद्दल बोलायचे झाले, तर २०२१ च्या अहवालानुसार तो वर्षाला १.५ कोटी रुपये कमावतो. बिग बींच्या सुरक्षेत तैनात असण्यासोबतच जितेंद्र स्वतःची सुरक्षा एजन्सी देखील चालवतो.
आमिर खान- युवराज घोरपडे
आमिर खानचा (Aamir Khan) पर्सनल बॉडीगार्ड युवराज घोरपडे आहे. मिस्टर परफेक्शनिस्टसोबत तो नेहमीच सावलीसारखा असतो. युवराजच्या पगाराबद्दल बोलायचे झाले तर, गेल्या वर्षी आलेल्या एका रिपोर्टनुसार, युवराज घोरपडेचा वार्षिक पगार सुमारे २ कोटी रुपये आहे. एका मीडिया रिपोर्टनुसार, युवराज घोरपडेने वयाच्या १६ व्या वर्षी शाळा सोडली आणि एका सुरक्षा एजन्सीमध्ये रुजू झाला. नंतर तो आमिर खानचा पर्सनल बॉडीगार्ड बनला.
अक्षय कुमार- श्रेयस ठेले
बॉलिवूडचा खिलाडी अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) बॉडीगार्ड श्रेयस ठेले आहे. तो अनेकदा अक्षयसोबत स्पॉट झाला आहे. अक्षयला फॅन्स आणि फॉलोअर्सपासून वाचवणे हे त्याचे काम आहे. २०२१ च्या रिपोर्टनुसार, अक्षय त्याच्या बॉडीगार्डला दरवर्षी १.२ कोटी रुपये देतो. त्यानुसार त्याचा दरमहा पगार १० लाख रुपये आहे. अक्षय कुमार व्यतिरिक्त श्रेयस त्याचा मुलगा आरवचीही सुरक्षा करतो.
अनुष्का शर्मा- प्रकाश सिंग
अभिनेत्री अनुष्का शर्माही (Anushka Sharma) तिचा बॉडीगार्ड प्रकाश सिंगला भरघोस पगार देते. अनुष्काचे विराटशी लग्न होण्याआधीच प्रकाश तिच्या संरक्षणात तैनात आहे. रिपोर्ट्सनुसार, प्रकाश सिंगचा वार्षिक पगार १.२ कोटी रुपये आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










