Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे अटक झालेली अभिनेत्री युविका चौधरी नक्की आहे तरी कोण?

आक्षेपार्ह भाष्य केल्यामुळे अटक झालेली अभिनेत्री युविका चौधरी नक्की आहे तरी कोण?

‘बिग बॉस ९’ फेम अभिनेत्री युविका चौधरीला सोमवारी (१८ ऑक्टोबर) रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनुसूचित जातींविरोधात आक्षेपार्ह कमेंट केल्याबद्दल हरियाणा पोलिसांनी अटक केली होती. मात्र, नंतर तिची अंतरिम जामिनावर सुटका करण्यात आली आहे. युविका टीव्ही इंडस्ट्रीची एक प्रसिद्ध अभिनेत्री असून, ती अनेक रियॅलिटी शोचा भाग राहिली आहे. युविकाचा जन्म २ ऑगस्ट १९८३ रोजी झाला. ती मूळची उत्तर प्रदेशातील बरौतची आहे. बिग बॉसमध्ये प्रवेश केल्यापासून युविकाचे फॅन फॉलोइंग लाखो कोटींवर पोहोचले. यामुळेच तिचे व्हिडिओ आणि ब्लॉग सोशल मीडियावर व्हायरल होतात.

युविकाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला, ज्यात ती तिचा पती प्रिन्स नरुलासोबत दिसत होती. त्याचवेळी, युविकाने एका विशिष्ट जातीबद्दल आक्षेपार्ह कमेंट केली. त्यानंतर, हा व्हिडिओ व्हायरल होताच या प्रकरणाला आग लागली. लोकांचा संताप उग्र रूपाने बाहेर येऊ लागला आणि त्यांनी युविकाच्या अटकेची मागणी वाढवायला सुरुवात केली. चला तर मग जाणून घेऊ युविका चौधरी कोण आहे.

युविकाने अनेक चित्रपट आणि टीव्ही शो मध्ये काम केले आहे आणि ती तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बरीच चर्चेत राहिली आहे. ‘बिग बॉस’च्या ९ व्या सीझननंतर तिने ऑक्टोबर २०१८ मध्ये अभिनेता प्रिन्स नरुलाशी लग्न केले. यापूर्वी युविकाने अभिनेता विपुल रॉयला १० वर्षे डेट केले होते. परंतु नंतर काही कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.

युविकाने ‘अस्तित्व-एक प्रेम कहानी’, ‘दफा ४२०’, ‘कुमकुम भाग्य’, ‘बिग बॉस ९’ आणि ‘लाल इश्क’. सारख्या शोमध्ये काम केले आहे. ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’ या चित्रपटातून तिने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते. २००७ साली ती फराह खानच्या ‘ओम शांती ओम’ चित्रपटात दिसली. यानंतर ती ‘तो बात पक्की’, ‘याराना’, ‘अफरा-तफरी’, ‘समर २००७’ आणि एका पंजाबी चित्रपटात काम केले होते.

प्रिन्स आणि युविकाची प्रेमकहानी बिग बॉस या रियॅलिटी टीव्ही शोमध्ये सुरू झाली होती. त्यानंतर दोघांनी लग्न केले. दोघांच्या लग्नाचे फोटोही सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते. टीव्ही जगतापासून बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील सेलिब्रिटी दोघांच्या लग्नात दिसले.

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखाद्या अभिनेत्रीला तिच्या जातीयवादी वक्तव्यामुळे टीकेला सामोरे जावे लागले आहे. याआधी ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ अभिनेत्री मुनमुन दत्ताने तिच्या एका सोशल मीडिया व्हिडीओमध्ये जातीवाद हा शब्द वापरला होता. ट्रोल झाल्यानंतर मुनमुनने माफी मागितली होती.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

अमृता राव आणि आरजे अनमोल पहिल्यांदाच शेअर करणार त्यांची ‘विवाह’पर्यंत पोहचलेली अनोखी प्रेमकहाणी

क्या अंदाज हैं! रोहनप्रीतच्या गळ्यावर चाकू ठेऊन नेहा कक्करने हटके अंदाजात केले प्री एनिवर्सरी सेलिब्रेशन

वामिकाच्या फोटोवर कमेंट करणाऱ्या रणवीरला नेटकऱ्यांनी विचारले, आई-बाबा कधी होणार?

हे देखील वाचा