अखेर मागील अनेक दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचे लग्न (९ डिसेंबर) रोजी सवाई माधेपूर येथे संपन्न झाले. या दोघांनी त्यांचे लग्न गुप्त आणि खासगी ठेवण्यासाठी अतिशय खबरदारी घेतली होती. त्यामुळे त्यांच्या लग्नाबद्दल कोणाकडेच काहीच माहिती नव्हती. लग्नाच्या दिवशी देखील मीडिया आणि त्यांचे फॅन्स सोशल मीडियावर नजर ठेऊनच होते, कुठूनतरी काहीतरी माहिती मिळेल. अशातच संध्याकाळच्या सुमारास कॅटरिना आणि विकी यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर त्यांच्या लग्नाचे काही निवडक फोटो पोस्ट केले आणि काही क्षणतच ते तुफान व्हायरल झाले.
लाल रंगाच्या लेहेंग्यामध्ये कॅटरिना गजबची सुंदर दिसत होती. यातच तिच्या हातावरची मेहेंदी, चुडा, दागिने एकंदरीतच तिचा लूक पाहून सर्वच जणं तिच्या सुंदरतेकडे पाहतच राहिले. तर विकी देखील पांढऱ्या रंगाच्या शेरवानी आणि फेट्यामध्ये अतिशय हँडसम दिसत होता. त्यांच्या व्हायरल होणाऱ्या फोटोंसोबतच कॅटरिनाने घातलेल्या अनेक गोष्टी सध्या तुफान चर्चेत आल्या आहेत. तिच्या लूकमधील काही महत्वाच्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया.
नववधू कॅटरिना आणि वर विकी त्यांनी त्यांच्या लग्नामध्ये फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाइन केलेले कपडे घातले होते. यासोबतच सब्यसाची मुखर्जी यांनीच डिझाइन केलेली ज्वेलरी घातली होती. कॅटरिनाने लाल रंगाचा लेहेंगा आणि विकीने आइवरी सिल्क शेरवानी घातली होती.
यासोबतच कॅटरिनाने अनायता श्रॉफ अदजानिया यांनी डिझाइन केलेले ‘कलीरे’ हातात घातले होते. एका माहिती नुसार तिने घातलेले हे आकर्षक कलीरे क्लियो, एलिसियन, बायबल आदी शब्दांनी सजवले होते. याशिवाय तिच्या कलीऱ्यांमध्ये बर्ड चार्म्सला दाखवण्यात आले होते. यात ६/७ संदेश होते. कॅटरिनाने हे कलीरे तिच्या चुड्याच्या पुढे घातले होते.
विकीने कॅटरिनाला साखरपुड्यात हिरे आणि नीलम यांनी युक्त अशी अंगठी घातली होती. कॅटरिनाच्या अंगठीमध्ये एक मोठा नीलम आणि त्याचं चहुबाजुंनी हिरे लावण्यात आले होते. तिची ही अंगठी ‘टिफनी एंड कंपनी’ची आयात आकाराची आहे. या अंगठीची किंमत 9800 USD अर्थात जवळपास ७,४०,७३५ रुपयांची आहे. यासोबतच तिने सब्यसाची मुखर्जी यांनीच डिझाइन केलेले मंगळसूत्र घातले होते. याची किंमत जवळपास ५ लाख आहे. तर विकी कौशलने जवळपास १,२८,५८० रुपयांची टिफनी क्लासिक एंगेजमेंट रिंग घातली होती.
विकी आणि कॅटरिना यांनी पारंपरिक हिंदू पद्धतीने लग्न केले. त्यांनी ९ डिसेंबरला दुपारी ३.३० ते ३.४५ यादरम्यान फेरे घेतले. या लग्नाचा मंडप फोर्टमध्ये असलेल्या एका मंदिराच्या समोर होता.
कॅटरिना फुलांनी सजवलेल्या डोलीमध्ये बसून तिच्या सूटमधून निघाली आणि मंडपात पोहचली. तर विकीने सेहेरा बंदीनंतर एका विन्तेज कारमध्ये बसून मंडपात एन्ट्री मारली. त्यांच्या मंडपाला शीश महालासारखे सजवण्यात आले होते. सोबतच मंडपाला पिवळ्या, नारंगी, गुलाबी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर करत सजवले होते.
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांच्या संगीताच्या केकवर जवळपास साडे चार लाख रुपये खर्च केले होते. हा केक दिल्लीमधील लोकप्रिय पेटिसियर मायरा झुनझुनवाला यांनी बनवला होता. ५ लेयर असणाऱ्या या केकवर चेरीने डिझाइन केले होते.
अधिक वाचा –