Thursday, March 5, 2026
Home मराठी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात ‘या’ दिवशी बांधणार तिच्या मित्रासोबत लगीनगाठ

महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम वनिता खरात ‘या’ दिवशी बांधणार तिच्या मित्रासोबत लगीनगाठ

मनोरंजनविश्वात सध्या अनेक जोड्या लग्नबंधनात अडकणार असल्याच्या चर्चा आहे. बॉलिवूडसोबतच मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील अनेक कलाकारांच्या लग्नांच्या जोरदार चर्चा आहे. यातच आता अजून एका मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे. आपल्या सहज सुंदर अभिनयाने आणि कमाईच्या कॉमिक टायमिंगमुळे मराठीसोबतच हिंदीमध्ये नावारूपास आलेल्या वनिता खरातच्या लग्नाची तारीख जाहीर झाली आहे. 

सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या शोमुळे प्रसिद्धी मिळवलेली आणि घराघरात पोहचलेली अभिनेत्री वनिता खरात लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. शाहिद कपूरच्या ‘कबीर सिंग’ या सिनेमात तिने अतिशय छोटी मात्र लक्षात राहणारी भूमिका साकारली होती. तिच्या या अतिशय छोट्या भूमिकेला मिळालेला प्रतिसाद पाहून, एका हिंदी अवॉर्ड फंक्शनमध्ये देखील हा सीन रिक्रिएट केला होता. वनिताने तिच्या प्रतिभेमुळे अमाप प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळवली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sumit Londhe (@sumit_ashok_londhe)

रंग, रूप, देह या पलीकडे जाऊन तिने स्वतःला सिद्ध केले. या इंडस्ट्रीमध्ये सुंदरतेपेक्षा अधिक प्रतिभेला महत्व असल्याचे तिने सिद्ध केले. शिवाय या सुंदरतेचा चौकटीमध्ये राहून विचार करणाऱ्या लोकांना देखील विचार करायची एक वेगळी दिशा दिली आहे. काही महिन्यांपूर्वीच वनिताने ती प्रेमात असल्याची कबुली दिली होती. ती आणि सुमित लोंढे रिलेशनशिपमध्ये असून, लवकरच ते लग्न देखील करणार आहे. वनिता आणि सुमित यांनी दिवाळी आणि नवीन वर्ष एकत्रच साजरे केले होते. याचे अनेक फोटो त्यानी सोशल मीडियावर शेअर केले होते. आता त्याच्या लग्नाची तारीख नुकतीच अधिकृतपणे वनिताने सांगितली आहे.

‘सरला एक कोटी’ या सिनेमाच्या ट्रेलर लाँन्चला आलेल्या वनिताने एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाची तारीख सांगितली आहे. ती येत्या २ फेब्रुवारी रोजी लगीनगाठ बांधत असून लवकरच ती पाहुणे, स्थळ आदी सर्वच गोष्टींची माहिती देणार असल्याचे सांगितले. लग्न जवळ आले असले तरी तिला तयारीला अजिबातच वेळ नाही. ती शूटिंग सांभाळत मिळालेल्या वेळात तयारी करत असल्याचे तिने सांगितले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

सुमित लोंढे हा एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर असून, त्याला फिरण्याचीही प्रचंड आवड आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातील अनेक मंडळी सुमितला ओळखतात. वनिताच्या लग्नाची तारीख अनेकदा जास्यजत्रेच्या अनेक स्किटमध्ये वापरण्यात आल्याचे देखील यावेळी तिने सांगितले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
‘छोरी २’ सिनेमाच्या सेटवर जखमी झाली नुसरत भरुचा, व्हायरल झाला व्हिडिओ
शाहरुख खान ठरला खरा ‘रईस’, श्रीमंत कलाकारांच्या यादीत हॉलिवूड स्टार्सला देखील टाकले मागे

 

हे देखील वाचा