प्रियांका चोप्रा मागील काही दिवसांपासून खूपच गाजत आहे. प्रियांका निक जोनासपासून घटस्फोट घेणार असल्याच्या बातम्या काही दिवसांपासून जोरदार चर्चेत आल्या आहेत. प्रियंकाने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून जोनास नाव काय काढले संपूर्ण जगात त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगायला सुरूवात झाली. मात्र या सर्व बातम्यांकडे दुर्लक्ष करत प्रियांका आणि निक त्यांचे जीवन मजेत जगत आहेत. त्यांचे विविध व्हिडिओ देखील मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. आज आपण या लेखातून प्रियांका आणि निक यांच्या संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
प्रियांका आणि निक दोघेही त्यांच्या देशातील सुपरस्टार. प्रियांकाने हॉलिवूडमध्ये काम करण्यास सुरूवात केली आणि तिला ग्लोबल ओळख मिळाली. जेव्हा प्रियांकाने निकसोबत लग्न केले त्यानंतर हे कपल आंतरराष्ट्रीय स्तरावर ट्रेंडिंगमध्ये आले. आज या दोघांना पॉवर कपल म्हणून ओळखले जाते. प्रियांका आणि निक दोघेही त्यांच्या ठिकाणी यशाच्या शिखरावर असून, दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत भरच पडत आहे. एकीकडे जशी त्यांची लोकप्रियता वाढत आहे, तशी दुसरीकडे त्यांच्या संपत्तीत देखील वाढ होत आहे.
जेव्हा तुम्हाला प्रियांका आणि निक यांच्या संपत्तीबद्दल समजेल तेव्हा नक्कीच तुमचे डोळे पांढरे होती. २०२० जीक्यु मासिकातील माहितीनुसार या दोघांचा आताच ऐकून नेटवर्थ आहे जवळपास ७३४ कोटी रुपये. प्रियांका आणि निक यांची लोकप्रियता बघता ते त्यांच्या कामासाठी तुफान पैसे चार्ज करतात. प्रियांका बॉलिवूड आणि हॉलिवूड दोन्ही क्षेत्रातून भरपूर पैसा कमावते.
याशिवाय प्रियांका तिच्या न्यूयॉर्कमधील रेस्टोरंट असलेल्या ‘सोना’मधून, वेगवेगळ्या स्टेज शोमधून, ब्रँड एंडोर्समेंटमधून बक्कळ पैसा कमावते. यासोबतच तिने पर्पल पेबल पिक्चर नावाचे प्रोडक्शन हाऊस चालू केले असून, यातून तिने व्हेंटिलेटर आणि स्काय इज पिंक या चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे. इंस्टावर एका स्पॉन्सर पोस्ट शेअर करण्यासाठी जवळपास १.५० लाख रुपये चार्ज करते
निक जॉनसबद्दल सांगायचे झाल्यास निकने त्याच्या भावांसोबत मिळून २०१३ साली ‘जोनास ब्रदर्स’ नावाचा एक बँड सुरू केला. २०१३ साली त्याने त्याचे सोलो म्युझिक करिअर सुरू केले. निक नेहमीच म्युझिक चार्टवर टॉपवर असतो. निक जोनास टकिला ब्रँड Villa One चा को ऑनर आहे. एका माहितीनुसार निकची नेटवर्थ संपत्ती जवळपास $50 मिलियन असून, लग्नानंतर त्याने आणि प्रियांकाने मिळून लॉस एंजलिसमध्ये १४४ कोटी रुपयांचे २० हजार स्क्वेयर फिटचे आलिशान घर घेतले.
प्रियांकाने डेटिंग अँप असलेल्या bumble मध्ये गुंतवणूक केली आहे. या अँपचे १०० मिलियन यूजर्स आहे. निकने प्रियंकाला $160,500 किंमतीची Mercedes-Benz Maybach गाडी गिफ्ट केली आहे. याशिवाय या दोघांकडे BMW 5 Series, Mercedes S-Class, Audi Q7, 1960 Ford Thunderbird, 1968 Ford Mustang, Chevrolet Camaro, Karma Fisker और Dodge Challenger R/T आदी अनेक आलिशान गाड्या आहेत.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
–काय सांगता! चक्क आमिर खानने मागितली केजीफ स्टार यशची माफी
–मलायका आणि अरबाजच्या घटस्फोटावर मुलगा अरहानची ‘अशी’ होती प्रतिक्रिया
–अरे वा! ‘मोनिशा’ आणि ‘अनुपमा’ची झाली भेट, या भेटीचा भन्नाट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल