Tuesday, March 5, 2024

बिगबाॅसच्या विजेत्याला मिळणार कार,होणार बक्षीसांचा वर्षाव, चला जाणुन घेऊया विनरच्या प्राइज मनीची रक्कम

सलमान खानचा(Salman Khan) रियालिटी शो बिगबाॅस 17च्या ग्रँड फिनालेला आता काहीच तास बाकी आहेत. बिगबाॅस 17ला त्यांचे फायनल 5 कंटेस्टंट मिळाले आहेत. त्यात अंकिता लोखंडे(Ankita lokhande), मुनावर फारुकी(Munawar Faruqui), मन्नारा चोप्रा(Mannara Chopra) आणि अरुण माशेट्टी(Arun Mashetty) यांचा समावेश आहे. चला तर मग जाणुन घेऊयात आज यातील जो विजेता असेल त्याला किती लाखांचा चेक मिळणार आहे.

बिगबाॅसची प्राइज मनी
जेव्हा 2007मध्ये बिगबाॅस सिझन 1ला त्यांचा विजेता मिळाला होता. तेव्हा शोची प्राइजमनी 1 करोड रुपये इरकी होती. राहुल राॅय त्या सिझनचा विजेता होता. त्यावेळी राहुल विजेता असल्यामुळे बागबाॅसच्या घराबाहेर जाताना तो एक करोड रुपये घेऊन गेला होता. परंतु त्यापुढे बिगबाॅसची प्राइजमनी मात्र कमी कमी होत गेली.

फिक्स नसते प्राइज मनी(Prize Money)
‘बिगबाॅस’ च्या पहिल्या सिझनपासून आपण पाहिले तर लक्षात येतं की, ‘बिग बाॅस ‘(big boss 17) च्या विजेत्याला मिळणारी रक्कम ठरवलेली किंवा इतकीच मिळेल असं नसतं. ही रक्कम आतापर्यंतच्या प्रत्येक सिझनमध्ये वेग-वेगळी आहे. जसंकी दीपिका कक्कर बिगबाॅस 12ची विजेती होती. तिला फक्त 30 लाख रुपये मिळाले होते. परंतु स्वर्गवासी अभिनेता सिद्धार्थ शुक्ला 2020मध्ये विजेता ठरला होता, आणि त्याला 50लाख रुपये मिळाले होते.

काय असेल ‘बिगबाॅस 17’ची प्राइजमनी?
अगदीच काही तासांत बिगबाॅस 17चा विजेता प्रेक्षकांसमोर असेल. त्यासोबतंच त्यांना हेही कळेल की विजेत्याने किती रक्कम जिंकली आहे. तर मिडिया रिपोर्टसनुसार यावर्शीच्या बिगबाॅस 17 च्या विजेत्याला चाळीस लाखांचा चेक मिळणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी प्राइजमनीसेबत अजुनही बक्षीसे विजेत्याला दिली जाणार आहेत. ‘बिग बॉस 17’चा विजेता घराबाहेर पडताना एकदम मालामाल होणार आहे. मिडियाच्या रिपोर्टचा विचार केला तर प्राइज मनी व्यातिरिक्त विजेत्याला कारदेखील मिळणार आहे. इतकंच नाही तर विजेत्याला वेग-वेगळ्या ब्रँडसकडुन महागडे गीफ्टही मिळणार आहेत.

हे देखील वाचा