Thursday, March 19, 2026
Home बॉलीवूड जाणून घ्या बक्कळ कमाई करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमातील कलाकारांचे मानधन

जाणून घ्या बक्कळ कमाई करणाऱ्या ‘द काश्मीर फाईल्स’ सिनेमातील कलाकारांचे मानधन

सध्या बॉलिवूडमध्ये, राजकीय चर्चांमध्ये, सोशल मीडियावर फक्त आणि फक्त एकाच सिनेमाची चर्चा आहे, आणि तो सिनेमा म्हणजे विवेक रंजन अग्निहोती दिग्दर्शित ‘द काश्मीर फाइल्स’. काश्मिरी पंडितांवर ९० च्या दशकामध्ये झालेल्या अत्याचावर आधारित असलेला हा सिनेमा स्टीह्य प्रभावी पद्धतीने तयार केला आहे. अतिशय कमी बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमाला प्रेक्षकांच्या इतका तगडा प्रतिसाद मिळेल याचा कोणीच विचार केला नसलं. लवकरच हा सिनेमा २०० कोटीच्या क्लबमध्ये सामील होणार आहे. या सिनेमाबद्दल आपण अनेक बातम्या, किस्से ऐकत आहोत, मात्र आज आम्ही तुम्हाला बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करणाऱ्या या सिनेमातील कलाकारांना किती मानधन देण्यात आले ते सांगणार आहोत.

अनुपम खेर :
अनुपम खेर यांनी या सिनेमात पुष्करनाथ पंडित ही भूमिका साकारली असून, अतिशय प्रभावी पद्धतीने ते पडद्यावर उठून आले आहेत. अनुपम खेर स्वतः काश्मिरी पंडित असल्याने आणि त्यांनी हे सर्व अत्याचार त्यांच्या डोळ्यांनी पाहिल्याने एका वेगळ्याच पातळीवर जाऊन त्यांनी ही भूमिका साकारली आहे. त्याला सिनेमासाठी १ कोटी रुपये दिल्याचे सांगितले जात आहे.

विवेक अग्निहोत्री :

द काश्मीर फाइल्स सिनेमाचे कप्तान असलेल्या अर्थात दिग्दर्शक असलेल्या विवेक अग्निहोत्री यांना सिनेमासाठी १ कोटी दिले गेले. जा सिनेमा पाहून प्रत्येक व्यक्ती त्यांच्या दिग्दतशांचे कौतुक करताना थकत नाही. इतके सुंदर दिग्दर्शन त्यांनी केले आहे.

पल्लवी जोशी :
विवेक अग्निहोत्री यांची पत्नी आणि अभिनेत्री असलेल्या पल्लवीने या सिनेमात राधिका मेनन हा महत्वाची भूमिका साकारली तिला चित्रपटासाठी ७०/०८० लाख मानधन मिळाले.

दर्शन कुमार :
या सिनेमात कृष्णा पंडित ही भूमिका साकारणाऱ्या प्रतिभावान अभिनेता असलेल्या दर्शन कुमारला सिनेमासाठी ४५ लाख रुपये देण्यात आले.

मिथुन चक्रवर्ती :
मिथुन चक्रवर्ती हे देखील सिनेमात मुख्य भूमिकेत आहे, त्यांनी चित्रपटात ब्रह्मदत्त या आयएस ची भूमिका साकारली आहे. त्यांना १.५ कोटी फी देण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

पुनीत इस्सर :
दिग्गज अभिनेते पुनीत इस्सर देखील या सिनेमाचा महत्वाचा भाग आहेत. त्यांनी चित्रपटात हरी नारीन ही भूमिका साकारली असून त्यांना ५० लाख मानधन देण्यात आले आहे.

मृणाल कुलकर्णी :
मराठमोळा चेहरा असलेल्या मृणाल कुलकर्णी यांनी देखील सिनेमात महत्वाची अशी लक्ष्मी दत्त ही व्यक्तिरेखा साकारली आहे. त्यांना सिनेमासाठी ५० लाखांचे मानधन दिले गेले.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा- 

हे देखील वाचा