सध्या अभिनेत्री कॅटरिना कैफ यशाच्या शिखराला स्पर्श करतेय. रील लाईफपासून ते रिअल लाईफपर्यंत सर्वत्र कॅटरिना सुपरहिट ठरत आहे. नुकत्याच आलेल्या तिच्या ‘सूर्यवंशी’ या चित्रपटाने धमाकेदार सुरुवात केली. हा चित्रपट लवकरच १५० कोटींचा टप्पा पार करणार आहे. वर्ष संपण्यापूर्वीच कॅटरिनाचा चित्रपट सुपरहिट झाला, यापेक्षा तिच्यासाठी आणखी चांगले काय असू शकते!
कॅटरिना ही बॉलिवूडमधील मेहनती आणि यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. काही वर्षांतच त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:चे स्थान निर्माण केले आहे. म्हणूनच आज मोठमोठे स्टार्सही तिच्यासोबत काम करण्यास उत्सुक आहेत. (know the net worth of bollywood s talented actress katrina kaif)
कॅटरिनाने २००३ मध्ये ‘बूम’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते आणि आजपर्यंत तिने ४० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीचा बॉलिवूडमधील प्रवास अजिबात सोपा नव्हता. लंडनमधून आलेल्या कॅटरिनाने चित्रपटात काम मिळवण्यासाठी स्वतःच्या व्यक्तिमत्त्वावर आणि भाषेवर खूप काम केले आहे. तिच्या याच मेहनतीचे फळ आहे की, आज तिची एकूण संपत्ती २२४ कोटी रुपये आहे. रिपोर्ट्सनुसार, कॅटरिना एका चित्रपटासाठी जवळपास ११ कोटी रुपये फी घेते. त्याचवेळी तिची ब्रँड एन्डोर्समेंटची फी जवळपास ६-७ कोटी आहे.
सर्वात विचित्र गोष्ट म्हणजे २२४ कोटींच्या मालमत्तेची मालकीण असूनही कॅटरिनाने इतक्या वर्षात मुंबईत घर घेतलेले नाही. भरपूर कमाई करूनही कॅटरिना रेंटच्या अपार्टमेंटमध्ये राहते.
सध्या कॅटरिना तिच्या लग्नामुळे चर्चेत आहे. माध्यमातील वृत्तानुसार, लवकरच विकी कौशल कॅटरिना कैफसोबत आयुष्याचा नवा प्रवास सुरू करू शकतो. या जोडप्याच्या लग्नाचे स्थळ जयपूर आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-सलमान अन् राणीने ‘तेरी चुनरिया’वर केला जबरदस्त डान्स, चाहत्यांच्या आठवणी झाल्या ताज्या
-कंगना रणौतला पुरस्कार, पण तुमच्या नावाचा विचार का नाही झाला? पाहा या प्रश्नावर काय म्हणाला सोनू सूद
-मलायका अन् लहान मुलांची जबरदस्त बॉंडिंग, चिमुकल्याने गाल ओढताच अभिनेत्रीने मारली मिठी










