देशातील नव्हे तर जगातील एक श्रीमंत व्यक्ती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अंबानी कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे.
दिनांक १० डिसेंबरला मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश आणि सुन श्लोका यांना पुत्ररत्न प्राप्त झाले. त्यामुळे संपूर्ण अंबानी कुटुंब या नवीन पाहुण्याच्या स्वागत व्यस्त आहे. नुकतेच अंबानी कुटुंबाने या नवीन बाळाचे नाव जाहीर केले आहे. ‘पृथ्वी’ असे या नवीन बाळाचे नामकरण करण्यात आले आहे. या नावाची अधिकृत घोषणा अंबानी परिवाराकडून नुकतीच करण्यात आली.
अंबानी कुटुंबाकडून एक फोटो सोशल मीडियावर शेयर केला गेला असून त्यात या नवीन बाळाच्या नावाची घोषणा केली आहे. बाळाच्या नावाची घोषणा बाळाच्या पणजी आजीने केली आहे. या पोस्ट मध्ये लिहले आहे की, ‘श्रीकृष्णाच्या कृपेने आणि धीरूभाई अंबानी यांच्या आशीर्वादाने, कोकिलाबेन अंबानी यांना पृथ्वी आकाश अंबानीच्या नावाची घोषणा करण्यात अतिशय आनंद होत आहे.’

‘बाळाचे आई, बाबा श्लोक आणि आकाश तसेच आजी, आजोबा नीता, मुकेश आणि मोना, रसेल यांनाही हे नाव जाहीर करतांना अतिशय आनंद होत आहे.’ असे सांगण्यात आले आहे. अंबानी घरामध्ये आकाश हे नवीन बाळाच्या वडिलांचे नाव असल्याने मुलाचे नाव पृथ्वी ठेवण्यात आले आहे.
दरम्यान, आकाश अंबानी आणि श्लोका मेहता यांचा साखरपुडा जून २०१८ मध्ये तर मार्च २०१९ मध्ये श्लोका आणि आकाश यांचा शानदार लग्न सोहळा संपन्न झाला होता. त्यांच्या लग्नात अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. भारतापासून स्वित्झर्लंड पर्यंत या दोघांच्या लग्नाचे कार्यक्रम झाले होते.