Friday, October 17, 2025
Home अन्य बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या ‘या’ जोड्यांचे प्रेम होऊ शकले नाही यशस्वी

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सच्या ‘या’ जोड्यांचे प्रेम होऊ शकले नाही यशस्वी

बॉलिवूड अभिनेत्री आणि क्रिकेटर्सचे नाते काही नवीन नाही. भारतात बॉलिवूडसारखे लोकप्रिय जर काही असेल तर ते क्रिकेट आहे. क्रिकेटर्स आणि बॉलिवूड कलाकारांमधील किस्से नेहमीच चर्चेत असतात. बॉलिवूड आणि क्रिकेट जगतात अशी अनेक जोडपी होती, ज्यांच्या प्रेमाची खूप चर्चा झाली. यापैकी काही जोडप्यांनी त्यांची जागा मिळवली आणि लग्न केले. परंतु काही जोडपी अशी होती ज्यांचे प्रेम कधीच फळाला आले नाही आणि त्यांची कहाणी अपूर्णच राहिली. काहींमध्ये फक्त प्रेमाच्या कहाण्या होत्या, काही जोडप्यांमध्ये प्रेमही होते, पण ही जोडपी कधीच एकमेकांची होऊ शकली नाहीत आणि त्यांच्या प्रेमाची कहाणी अपूर्णच राहिली. चला तर मग जाणून घेऊया की, बॉलिवूड अभिनेत्री आणि कोणत्या क्रिकेटर्समधील प्रेमाच्या चर्चा झाल्या मात्र ते कधीही एक नाहीत.

दीपिका पदुकोण आणि युवराज सिंग :

एक काळ असा होता जेव्हा भारतीय फलंदाज युवराज सिंग आणि अभिनेत्री दिपीका पदुकोण यांच्या प्रेमाचे किस्से खूप चर्चेत होते. अनेक कार्यक्रमांमध्ये दोघेही एकमेकांसोबत दिसले. २००७ मध्ये किम शर्मासोबत ब्रेकअप झाल्यानंतर युवराज आणि दिपीका यांच्यात प्रेम असल्याच्या बातम्या पसरल्या. परंतु त्यांची प्रेमकहाणी फार काळ टिकली नाही आणि काहीकाळातच त्यांचे ब्रेकअप झाल्याची बातमी आली. नंतर दिपीका रणवीर सिंगसोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि आज ती त्याच्यासोबत लग्न करून आनंदी आयुष्य जगत आहे. तर युवराजने बॉलिवूड अभिनेत्री बॉडीगार्ड फेम हेजल कीचसोबत लग्न केले.

हेमा मालिनी आणि एस. व्यंकटरघवन :

हेमा मालिनी यांची गणना बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये केली जाते, तर एस. वेंकटराघवन हे भारताचे प्रसिद्ध क्रिकेटपटूही राहिले आहेत. वेंकटराघवन हे देखील अशा लोकांपैकी एक होतेे, जे हेमा मालिनी यांच्या सौंदर्यावर फिदा होते. एकदा त्यांनी आपल्या मनातील गोष्ट हेमा मालिनी यांना सर्वांसमोर सांगितली होती. पण हेमा मालिनी यांनी त्यांचा प्रस्ताव स्वीकारला नाही.

अमृता सिंग आणि क्रिकेटर रवी शास्त्री :

अमृता सिंग ही तिच्या काळातील प्रसिद्ध अभिनेत्री होती. तर रवी शास्त्री हे क्रिकेटमधील अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जात होते. माध्यमांमध्ये या दोघांच्या प्रेमाची बरीच चर्चा झाली. असे म्हणतात की, दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते पण त्यांचे प्रेम कधीच फळाला आले नाही. अमृता सिंगने सैफ अली खानशी लग्न केले, तर रवी शास्त्री यांनी रितूशी लग्न केले.

रेखा आणि इम्रान खान :

बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांचे आयुष्य नेहमीच वादांच्या भोवऱ्यात असते. त्यांच्या जीवनातील अनेक कथा चर्चेत राहिल्या आहेत. रेखा यांचे नाव नेहमीच अमिताभ बच्चन यांच्यासोबत जोडले जात असले, तरी एक काळ असा होता की, रेखा यांचे नाव पाकिस्तान क्रिकेट संघाचे माजी कर्णधार इम्रान खान यांच्यासोबतही जोडले जात होते. त्यांच्यात प्रेमही होते असे सांगितले जाते. इम्रान यांचे रेखा यांच्यावर खूप प्रेम होते. पण त्यांना कोणत्याही अभिनेत्रीशी लग्न करायचे नव्हते. त्यामुळे त्यांचे नाते पुढे जाऊ शकले नाही.

नीना गुप्ता आणि व्हिव्हियन रिचर्ड्स :

अभिनेत्री नीना गुप्ता केवळ त्यांच्या अभिनयासाठीच नाही, तर तिच्या आयुष्यातील अनेक किस्स्यांसाठीही चर्चेत असतात. वेस्ट इंडिजचे माजी क्रिकेटपटू व्हिव्हियन रिचर्ड्स आणि नीना गुप्ता यांच्यात एकेकाळी प्रेमसंबंध असल्याच्या बातम्या आल्या होत्या. नीना या प्रेग्नेंट देखील झाल्या होत्या. दोघेही बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते, पण दोघांनी एकमेकांशी लग्न केले नाही. त्यानंतर नीना यांनी त्यांच्या मुलीला मासाबाला जन्म दिला आणि तिचा एकटीनेच सांभाळ केला.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘इंटिमेट सीन करायचा असेल, तर…’, सुपरहिट ‘झिम्मा’ चित्रपटातील किसींग सीनबाबत सायली संजीवचे मोठे वक्तव्य

-मिलिंद गुणाजी यांच्या मुलाचा साखरपुडा थाटात पडला पार, सूनबाई आहेत ‘या’ क्षेत्राशी निगडित

-ऐकलंत का! गायिका योगिता बोराटेंचा ‘प्रेमरंग’ कार्यक्रम लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

हे देखील वाचा