Thursday, December 5, 2024
Home बॉलीवूड कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा होता पुनीत; वीरप्पनने केले होते त्याच्या वडिलांचे अपहरण

कन्नड सुपरस्टार राजकुमार यांचा मुलगा होता पुनीत; वीरप्पनने केले होते त्याच्या वडिलांचे अपहरण

कन्नड चित्रपट अभिनेता पुनीत राजकुमारचे जिममध्ये व्यायाम करताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुनीतची प्रकृती खालावल्याने शुक्रवारी (२९ ऑक्टोबर) सकाळी ११.३० वाजता बेंगळुरू येथील विक्रम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. पुनीत ४६ वर्षांचा होता. त्याच्या निधनामुळे संपूर्ण कर्नाटकात शोककळा पसरली आहे. राज्यातील सर्व चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आली आहेत. परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक भागात कलम १४४ लागू करण्यात आले आहे. यावरून त्याच्या फॅन फॉलोविंगचा अंदाज लावला जाऊ शकतो. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईही रुग्णालयात पोहोचले होते.

बालकलाकार म्हणून केली होती कारकिर्दीची सुरुवात
पुनीतने आपल्या चित्रपट कारकिर्दीची सुरुवात बालकलाकार म्हणून केली होती. त्याला राष्ट्रीय पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. यावरून त्याच्या प्रसिद्धीचा अंदाज लावता येतो.

अभिनेत्यासह होता गायक
पुनीत केवळ अभिनेताच नाही, तर गायकही होता. त्याचा जन्म १७ मार्च, १९७५ रोजी झाला होता. २००२ मध्ये आलेल्या ‘अप्पू’ या चित्रपटातून त्याने आपल्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्याने २९ पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते.

वडिलांचे झाले होते अपहरण
पुनीतचे दक्षिण भारतीय चित्रपटांमधील प्रसिद्ध नाव होते. पुनीतचे वडील राजकुमार हे इंडस्ट्रीतील मोठे नाव होते. त्यांना कन्नड चित्रपटसृष्टीचे आयकॉन मानले जायचे. दादासाहेब फाळके पुरस्कार प्राप्त करणारे ते पहिले कन्नड इंडस्ट्री अभिनेते होते. त्यांचे २००० मध्ये चंदन तस्कर वीरप्पन याने अपहरण केले होते.

पुनीत होता घरातील सर्वात लहान मुलगा
पुनीत हा पाच भावंडांमध्ये सर्वात लहान होता. पुनीतचे वडील राजकुमार त्याला आणि त्याच्या बहिणीला चित्रपटाच्या सेटवर घेऊन जायचे. पुनीतचा मोठा भाऊ शिवा राजकुमार हा देखील प्रसिद्ध अभिनेता आहे. चित्रपटांसोबतच त्याने छोट्या पडद्यावर कन्नड कोटियाधिपती हा गेम शो देखील होस्ट केला. पुनीत हा कन्नड चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बिग ब्रेकिंग! अभिनेता पुनीत राजकुमारचे निधन; क्रिकेटर वेंकटेश प्रसाद यांनी ट्विटरवरून दिली माहिती

-चाहत्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या पुनीतने बालपणीही गाजवलीय सिनेसृष्टी; दोन ‘राष्ट्रीय पुरस्कार’ केले होते नावावर

-मोठी बातमी! सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या निधनामुळे कर्नाटकात दु:खी चाहते उतरले रस्त्यावर, कलम १४४ लागू

-‘पावरस्टार’ पुनीतच्या निधनाने हळहळली सिनेसृष्टी; चिरंजीवी ते नागार्जुन, ‘या’ कलाकारांनी व्यक्त केले दु:ख

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा