बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने ‘फॅशन’, ‘क्वीन’, ‘तनु वेड्स मनू’ आणि ‘पंगा’ यांसारख्या चित्रपटांसाठी ४ राष्ट्रीय पुरस्कार मिळवले. कंगनाला नुकताच देशाचा चौथा सर्वोच्च सन्मान पद्मश्री मिळाला आहे. मात्र, सध्या ती आपल्या वादग्रस्त विधानांमुळे अधिक चर्चेत आहे. एका टीव्ही चॅनेलच्या कार्यक्रमात कंगनाने १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला ‘भीक’ आणि खरे स्वातंत्र्य २०१४ मध्ये मिळाले असल्याचे म्हटले होते.
इतकेच नाही, तर कंगनाने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दलही वादग्रस्त विधान केले आहे. भगतसिंग आणि सुभाषचंद्र बोस यांना महात्मा गांधींचा पाठिंबा मिळाला नसल्याचा दावा कंगनाने केला. कंगना म्हणाली की, आणखी एक गाल पुढे केल्याने तुम्हाला ‘भीक’ मिळते स्वातंत्र्य नाही.
सोशल मीडियावर अनेक लोक कंगनाचे समर्थन करत आहेत, तर अनेकजण विरोध करत आहेत. या मुद्द्यावरून राजकीय गदारोळही झाला आहे. कंगनाकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घेण्याचीही मागणी होत आहे. त्याचवेळी देशाच्या अनेक भागांत तिच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नावाने केलेले एक ट्वीटही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
राष्ट्रपतींच्या नावाने व्हायरल होत असलेल्या ट्वीटमध्ये काय आहे?
कंगनाच्या या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रपतींच्या नावाने केलेले ट्वीट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कंगनाकडून ‘पद्मश्री’ पुरस्कार परत घेण्याची चर्चा सुरू आहे. ट्वीटमध्ये राष्ट्रपतींच्या हवाल्याने म्हटले आहे की, “कंगना रणौतने केलेली टिप्पणी देशाच्या भावना दुखावणारी आहे. त्यांना पद्मश्री पुरस्कार देताना मला स्वतःला लाज वाटते. मी सरकार नरेंद्र मोदींना विनंती करतो की, मला पुरस्कार मागे घेण्याची परवानगी द्यावी.”
काय म्हणाली होती कंगना?
आपल्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या कंगना रणौतने भारताला १९४७ मध्ये मिळालेल्या स्वातंत्र्याला ‘भीक’ आणि खरे २०१४ मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याचे वक्तव्य करून वाद निर्माण केला आहे
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-…आणि म्हणून नवविवाहित दांपत्य राजकुमार राव-पत्रलेखाने रद्द केला हनिमूनचा बेत
-अभिनेता आयुषमन खुरानाचा लाडका भाऊ; प्रत्येक अभिनयात ‘अपारशक्ती’ लावून बनलाय बॉलिवूडचा टायमिंग किंग