Monday, June 23, 2025
Home टेलिव्हिजन यामुळे टायगर श्रॉफला येतो रणवीर सिंगचा प्रचंड राग; म्हणाला, ‘त्याची बायको…’

यामुळे टायगर श्रॉफला येतो रणवीर सिंगचा प्रचंड राग; म्हणाला, ‘त्याची बायको…’

करण जोहर त्याच्या शोच्या नवीन भागांसह मनोरंजनाचा एक डोस आणण्यासाठी सज्ज आहे. सोमवारी त्याने सोशल मीडियावर ‘कॉफी विथ करण 7’ चा नवीन प्रोमो शेअर केला, ज्यामध्ये टायगर श्रॉफ आणि क्रिती सेनन या कार्यक्रमात नवीन पाहुणे बनले आहेत. 2014 मध्ये ‘हिरोपंती’ या चित्रपटातून एकत्र पदार्पण करणारे टायगर आणि क्रिती लवकरच त्यांचा दुसरा चित्रपट ‘गणपत’ घेऊन एकत्र येणार आहेत. या कार्यक्रमात त्यांनी चित्रपटाबद्दल अनेक खुलासे केले. 

बॉलिवूड निर्माता करण जोहरचा कॉफी विथ करण हा कार्यक्रम चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात अनेक लोकप्रिय कलाकार सहभागी होत असतात. अलिकडेच या कार्यक्रमात क्रिती सेनन आणि टायगर श्रॉफने हजेरी लावली होती. ‘कॉफी विथ करण’मध्ये पोहोचलेल्या टायगरने खाली पांढऱ्या शर्टसह पिवळा सूट घातला आहे. स्टायलिश सनग्लासेससह टायगर खूपच डॅशिंग दिसत आहे. दुसरीकडे, क्रितीने हॉट पिंक कलरचा ड्रेस परिधान केला आहे ज्यामध्ये ती खूपच सुंदर दिसत आहे. कार्यक्रमात दोघांनी अनेक खुलासे केले.

तो क्रितीला विचारतो की, ‘हिरोपंती’मध्ये पदार्पण करण्यापूर्वी तिला अनेक ऑडिशनमध्ये नाकारण्यात आले आहे का? यावर क्रिती म्हणते, ‘माझी पहिली ऑडिशन कोणती होती हे तुम्हाला माहीत आहे?’ कृती पुढे म्हणते, ‘स्टुडंट ऑफ द इयर, फॉर फर्स्ट वन. हे उत्तर ऐकून करण जोहर चांगलाच चकित झालेला पाहायला मिळाला.

‘कॉफी विथ करण 7’ च्या रॅपिड फायर राउंडचा एक सीन देखील प्रोमोमध्ये आहे. टायगरला प्रश्न करत करण म्हणतो की अशी कोणती गोष्ट आहे ज्यासाठी त्याला रणवीर सिंगचा हेवा वाटतो? टायगर उत्तर देतो आणि म्हणतो ‘त्याची पत्नी’ म्हणजेच दीपिका पदुकोण. याचे कारण सांगताना टायगर म्हणत आहे की, रणवीरची पत्नी खूप प्रतिभावान आहे आणि खूप सुंदरही आहे. त्याची ही प्रतिक्रिया सध्या चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – पाकिस्तानला धुळ चारल्यानंतर बॉलिवूड कलाकारांचा राडा, पाहा व्हायरल पोस्ट
स्टुडंट ऑफ द इयरमध्ये झळकणार होती क्रिती सेनन, पण यामुळे लागली आलियाची वर्णी
नयनतारा आणि शाहरुख खानच्या चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर, वाचा 

हे देखील वाचा