सुप्रसिद्ध बॉलिवूड दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (vivek Agnihotri) अलीकडेच ‘कोलकाता डॉक्टर रेप मर्डर केस’ दरम्यान त्याच्या एका जुन्या ट्विटमुळे चर्चेत आला होता. आता विवेक कोलकाता येथे मृत डॉक्टरांच्या समर्थनार्थ काढण्यात येणाऱ्या रॅलीसाठी लोकांना आवाहन करताना दिसत आहे. खुद्द विवेकही या रॅलीत सहभागी होऊन आंदोलनाला पाठिंबा देणार आहे.
विवेक अग्निहोत्रीने त्याच्या एक्स अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर करताना लिहिले, “हॅलो, कोलकाता! उद्या, मी ऑन ड्युटी डॉक्टरच्या क्रूर बलात्कार आणि हत्येविरुद्धच्या निषेध रॅलीत सहभागी होणार आहे. मी सर्व नागरिकांना विनंती करतो की त्यांनी महिलांच्या सुरक्षिततेच्या आणि जगण्याच्या अधिकाराच्या मागणीसाठी माझ्यासोबत सहभागी व्हावे.”
https://x.com/vivekagnihotri/status/1825873176099786986
मृतांच्या समर्थनार्थ आणि न्यायाच्या मागणीसाठी लोक 21 ऑगस्ट रोजी कोलकाता येथे पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतील. ही रॅली खूप मोठी असणार असून त्यात हजारो लोक पोहोचण्याची अपेक्षा आहे. विवेक स्वतःही या निषेध रॅलीचा भाग असणार आहे. 21 ऑगस्ट रोजी दुपारी 3.30 वाजेपासून कोलकातामधील मौला अली ते डोरिना क्रॉसिंगपर्यंत निषेध रॅली काढण्यात येणार असल्याचे दिग्दर्शकाने सांगितले आहे.
विवेक अग्निहोत्री 21 ऑगस्ट रोजी होणाऱ्या विशाल निषेध रॅलीत सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे पोहोचले आहेत. त्याने X वर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे, नमस्कार मित्रांनो. कोलकाता येथील तरुणी डॉक्टरसोबत जे घडले ते शब्दात मांडता येणार नाही. नागरिक म्हणून आपण सर्वजण याचा निषेध करू शकतो आणि आवाज उठवू शकतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा –
पहिल्याच नजरेत हेमा मालिनीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, अशाप्रकारे झाले लग्न
जे कृत्यच पाशवी, अमानवी आहे… त्याला शिक्षा तरी मानवी का असावी ? बदलापूर घटनेवर अभिजित केळकरची संतापजनक पोस्ट…