गेल्या काही महिन्यांपासून मॉडेल आणि अभिनेत्रींच्या आत्महत्येच्या बातम्यांमुळे कोलकाता हे नाव चर्चेचा विषय ठरले आहे. ज्या अंतर्गत पुन्हा अशीच काहीशी बातमी समोर येत आहे. आता कोलकात्याच्या आणखी एका मॉडेलच्या आत्महत्येची बातमी समोर आली आहे. कोलकाता येथील पूजा सरकार (Pooja Sarkar) नावाच्या २१ वर्षीय मॉडेलने नुकतेच आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
रविवारी (१८ जुलै) २१ वर्षीय कोलकाता मॉडेल आणि विद्यार्थिनी पूजा सरकारचा मृतदेह तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. रिपोर्ट्सनुसार, पूजा शनिवारी (१७ जुलै) एका मैत्रिणीला भेटण्यासाठी बाहेर रेस्टॉरंटमध्ये पोहोचली होती. त्यानंतर ती आपल्या घरी परतली आणि मग अचानक असे काय झाले की, तिने स्वतःला खोलीत कोंडून घेतले. त्यानंतर तिच्या खोलीतून काहीच हालचाल न झाल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. घटनास्थळी येऊन पोलिसांनी दार उघडले असता, पूजाने टॉवेलच्या साहाय्याने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. मात्र, तिच्या खोलीतून कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट सापडली नाही. त्यामुळे तिच्या आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही. (kolkata model puja sarkar committed suicide)
गेल्या महिनाभरात कोलकात्यातील अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी केलीय आत्महत्या
विशेष म्हणजे, कोलकात्यात मॉडेलने आत्महत्या केल्याची ही घटना नवीन नाही. गेल्या महिनाभराबाबत बोलायचे झाले तर, अभिनेत्री आणि मॉडेलने मृत्यूला कवटाळल्याची राज्यातील ही जवळपास पाचवी घटना आहे. यापूर्वी बिदिशा डे मजुमदार, पल्लवी डे, मंजुषा नियोगी आणि सरस्वती दास यांनी आत्महत्येचा मार्ग स्वीकारलाय. अशा परिस्थितीत, कोलकात्यात या गूढ पद्धतीने होणाऱ्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.
हेही वाचा










