Thursday, June 13, 2024

खळबळजनक! परफॉर्मेंसच्या काही मिनिटांपूर्वी प्रसिद्ध गायिका बाथरूममध्ये सापडली मृतावस्थेत, चाहत्यांना बसला धक्का

कोरियन सिनेसृष्टीत एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खरे तर, प्रसिद्ध सोप्रानो गायिका ली संग यून हिचे निधन झाले आहे. वयाच्या अवघ्या 46व्या वर्षी तिने या जगाचा निरोप घेतला. धक्कादायक म्हणजे ली संग यून तिच्या परफॉर्मेंसच्या काही मिनिटांपूर्वी बाथरूममध्ये मृतावस्थेत सापडली होती. तिच्या अकाली निधनाच्या वृत्ताने चाहते आणि संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. सध्या तिच्या मृत्यूचे कारण समोर आलेले नाही. गायिकाच्या मृत्यूमागचे कारण तपासले जात आहे.

माध्यमातील वृत्तांनुसार, ली संग-युनचा मृतदेह महिलांच्या बाथरूममध्ये सापडला होता. हे प्रथम कार्यक्रमातील एका कर्मचाऱ्याच्या लक्षात आले, त्यानंतर त्यांनी तत्काळ अधिकाऱ्यांना माहिती दिली. गायिकाच्या परफॉर्मन्सच्या आधी ही घटना घडल्याने सर्वांनाच खुप दु:ख झाले. एका कर्मचार्‍याने सांगितले की, ‘ली संग युनची स्टेजवर जाण्याची वेळ आली होती, पण ती स्टेजच्या बॅकस्टेजवरही नव्हती. तिची शोधाशोध केल्यावर ती बाथरूममध्ये जमिनीवर पडून असल्याचे मला दिसले.’

ली संग युनचा मृत्यू कसा झाला? गायिकाचा खून झाला आहे का? असे प्रश्न प्रत्येकाच्या मनात घर करत आहेत. मात्र, सध्या यापैकी एकाही प्रश्नाचे उत्तर अधिकारी देऊ शकत नाहीत. गायिकाच्या मृत्यूमागचे कारण तपासले जात आहे.

ली संग यून ही एक प्रतिभावान सोप्रानो गायक होती, ज्यांची कारकीर्द चांगली होती. तिने सोल नॅशनल युनिव्हर्सिटीमधून पदवी प्राप्त केली, जिथे तिला संगीताची आवड निर्माण झाली. दिवंगत गायिकाला गिमचेन म्युनिसिपल कॉयरच्या 33 व्या मैफिलीत सादर करण्यासाठी आमंत्रित केले गेले होते, परंतु ती सादर करण्यापूर्वीच तिचे निधन झाले.(korean singer lee sangeun found dead in bathroom minutes before her performance)

अधिक वाचा-
HAPPY BIRTHDAY | ​​’एमएस धोनी’ चित्रपटापेक्षा वेगळी आहे ​​माहीची लव्हस्टोरी? ‘अशी’ झाली होती साक्षीसोबत पहिली भेट
‘जवान’ चित्रपटचा ट्रेलर लॉन्च हाेण्यापूर्वी नयनताराचा लूक झाला लीक? साेशल मीडियावर उडाली खळबळ

हे देखील वाचा