शाहरुख खानच्या ‘जवान‘ या चित्रपटाच्या ट्रेलरची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. टॉम क्रूझच्या मिशन इम्पॉसिबल: डेड रेकनिंग या चित्रपटासह ट्रेलर थिएटरमध्ये दाखवला जाईल. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. ट्रेलर लॉन्चची उलटी गिनती सुरू असतानाच आता नयनताराचा एक फोटो व्हायरल होत आहे. जवानमधला तिचा हा फर्स्ट लूक असल्याचं बोललं जात आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
नयनताराच्या फॅन अकाऊंटवर हा फोटो पोस्ट करण्यात आला आहे, ज्यामध्ये ती बॉलरूममध्ये बसलेली दिसत आहे. फोटोमध्ये तिने गुलाबी रंगाचा ड्रेस घातलेला दिसत आहे. हा फोटो खरा आहे की, फोटोशॉप केलेला अद्याप याची पुष्टी आलेली नाही.
‘जवान’ हा नयनताराचा बॉलिवूडमधील डेब्यू चित्रपट आहे. माध्यमातील वृत्तांनुसार, नयनतारा या चित्रपटात शाहरुख खानसोबत दिसणार आहे. शाहरुखशिवाय जवानमध्ये नयनतारा, विजय सेतुपती आणि सान्या मल्होत्रा यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. दीपिका पदुकोण या चित्रपटात कॅमिओ रोल करताना दिसणार असल्याचेही वृत्त आहे.
https://twitter.com/NayanthaaraF/status/1676833684492800001?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1676833684492800001%7Ctwgr%5Ec5aafab8043b5b53075bec859168469920a39cd9%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.abplive.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fjawan-trailer-shah-rukh-khan-film-nayanthara-first-look-leaks-online-2447838
ट्रेलर लवकरच होणार रिलीज
चित्रपटाचा ट्रेलर पुढच्या आठवड्यात प्रदर्शित होणार आहे, परंतु काही रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, त्यापूर्वी चित्रपटाचा टीझर येऊ शकतो. माध्यमातील वृत्तांनुसार, ‘जवान’चा टीझर 7 जुलै किंवा 15 जुलै रोजी लॉन्च केला जाऊ शकतो आणि तो आतापर्यंतचा सर्वात मोठा डिजिटल लॉन्च असेल.जवानचा टीझर चेन्नईत लॉन्च करण्यासाठी निर्माते खास पाहुण्यांच्या शोधात आहेत. पाहुणे फायनल झाल्यानंतर टीझरची तारीखही फायनल केली जाईल. मंडळी, ‘जवान’ चित्रपच 7 सप्टेंबर 2023 रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.(bollywood movie jawan trailer shah rukh khan film nayanthara first look leaks online)
अधिक वाचा-
–ब्रेकिंग! मिथुन चक्रवर्ती यांच्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, डोळ्यातील अश्रू थांबता थांबेना
–उर्फीने सुंदर दिसण्यासाठी केले लिप फिलर्स, अभिनेत्रीच्या सुजलेल्या ओठांचे फोटो पाहून तुम्ही व्हाल थक्क