कृतिका सेंगर (Kratika Sengar) आणि निकितिन धीर (Nikitin Dheer) यांना टीव्ही जगतातील पॉवर कपल म्हटले जाते. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. निकितिन धीर लवकरच पिता होणार हे सर्वांनाच माहीत आहे. अशा परिस्थितीत त्याची पत्नी कृतिका तिच्या प्रेग्नेंसीच्या दिवसांचा खूप आनंद घेताना दिसत आहे. अलीकडेच, अभिनेत्रीने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटची काही फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहेत. या कपलचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. चाहतेही या जोडप्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
साल २०१४ मध्ये लग्नबंधनात अडकलेली कृतिका आणि निकितिन सोशल मीडियावर कपल गोल सेट करताना दिसत आहे. या जोडप्याने २०२१ मध्ये आई-वडील बनण्याची आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. लग्नाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर हे जोडपे आई-वडील होणार आहेत, ज्यासाठी दोघेही खूप उत्सुक आहेत. (kratika sengar and nikitin dheer twin in black for maternity photoshoot)
कृतिकाने तिच्या मॅटर्निटी फोटोशूटमध्ये ऑल ब्लॅक लूक कॅरी केला आहे. कृतिका बॉडीकॉन ड्रेसमध्ये तिचा बेबी बंप फ्लॉंट करताना दिसत आहे. तर त्याच वेळी, निकितिन आपल्या सुंदर पत्नीच्या कपाळावर किस घेऊन तिच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. हे गोड फोटो शेअर करत कृतिकाने कॅप्शनमध्ये लिहिले, “आनंद वाटेवर आहे…” तसेच, कृतिकाला आई बनताना पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक दिसत आहेत.
या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. निकितिन आपल्या पत्नी कृतिकाची एका परफेक्ट पतीप्रमाणे खूप काळजी घेतो. आजकाल तो आपल्या पत्नीचे खूप लाड करत आहे आणि तिच्या प्रत्येक गरजेची काळजी घेत आहे.