Thursday, April 25, 2024

‘झांसी की रानी’ मधून मिळाली होती तिला ओळख; तर अशा प्रकारे ‘थंगबली’शी बांधली कृतिका सेंगरने लगीनगाठ

‘झांसी की रानी’ फेम अभिनेत्री कृतिका सेंगर तर तुम्हा सर्वांना आठवतच असेल. आपल्या दमदार अभिनयाने ती घराघरात पोहचली. झांसीच्या राणीचे पात्र पडद्यावर साकारल्याने तिची टेलिव्हिजनवर एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. आज कृतिकाचा वाढदिवस आहे. (Birthday special : let’s know career journey of Jhansi ki Rani fame actress Kratika Sengar)

कृतिकाचा जन्म ३ जुलै १९८६ रोजी उत्तरप्रदेशमधील कानपुर येथे झाला होता. तिचे शालेय शिक्षण कानपूरमध्येच पूर्ण झाले. त्यानंतर तिने एमीटी युनिव्हर्सिटी दिल्लीमधून तिचे ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

कृतिकाने सुरुवातीला न्यूज एजेन्सीमध्ये काम केले आहे. त्यानंतर २००७ मध्ये तिने एकता कपूरची ‘क्योंकी सास भी कभी बहू थी’ या लोकप्रिय मालिकेतून टेलिव्हिजनवर पदार्पण केले. तिने अनेक मालिकांमध्ये काम केले, पण ‘झांसी की रानी’ या मालिकेतून तिला तिची खरी ओळख मिळाली. या मालिकेतील तिचा अभिनय पाहून सगळेच तिचे चाहते झाले होते. त्यानंतर तिने ‘पुनर्विवाह’ या मालिकेत काम केले. कृतिका एक अशी अभिनेत्री आहे, जी कोणत्याही प्रकारच्या भूमिकेला न्याय देऊ शकते. त्यानंतर ती ‘सर्व्हिसवाली बहू’ या मालिकेतून एका वेगळ्याच रुपात प्रेक्षकांसमोर आली. त्यानंतर तिने ‘छोटी सरदारनी’ या मालिकेत काम केले.

तिने ‘कसोटी जिंदगी की’, ‘क्या दिल मैं है’, ‘किस देश मैं है मेरा दिल’, ‘एक वीर की अरदास वीरा’, ‘देवों के देव महादेव’, यासारख्या मालिकेत काम केले आहे. तिच्या अभिनयाच्या करिअरला १४ वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिने तिच्या चाहत्यांचे आभार देखील मानले होते.

कृतिका सेंगरने २०१४ मध्ये पंकज धीर यांनी दिग्दर्शन केलेला ‘माय फादर गॉड फादर’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. यासोबतच तिने ‘रीड साय सायलेन्स’ या चित्रपटात काम केले. या वेळी पंकज यांनी तिला लग्नाबाबत प्रश्न विचारले होते तेव्हा ती म्हणाली की, “घरचे मुलगा बघत आहेत, ते जेव्हा म्हणतील तेव्हा मी लग्न करेल.”

कृतिकाने माध्यमांशी बोलताना सांगितले की, “पंकज सरांनी मला विचारले तुझा कोणी बॉयफ्रेंड आहे का ??” यावर मी त्यांना “नाही” असे उत्तर दिले. त्यानंतर ते म्हणाले की, “तू माझ्या मुलाशी लग्न करशील का?? मला अगदी तुझ्याप्रमाणेच सून हवी आहे.”

पंकज यांचा मुलगा ‘चेन्नई एक्स्प्रेस’ मधील थंगाबली फेम अभिनेता निकितीन धर हा आहे. कृतिका आणि त्याचे २०१४ मध्ये लग्न झाले आहे. ते आता त्यांच्या करिअरसोबत त्यांच्या वैयक्तिक आयुष्य देखील आनंदात आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हे देखील वाचा