काही स्टार्स किड्स हे चित्रपटांमध्ये न येता देखील तुफान लोकप्रिय होतात. एखाद्या नावाजलेल्या कलाकाराला मिळणाऱ्या लोकप्रियतेपेक्षाही अधिक लोकप्रियता त्यांना मिळते. बॉलिवूडमध्ये आणि सामान्य लोकांमध्ये या स्टार किड्सची क्रेझ काहीतरी वेगळीच आहे. असे अनेक स्टार किड्स आहेत, जे फक्त सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सच्या संपर्कात असतात. सोशल मीडियावर त्यांची फॅन फॉलोविंग पाहून आपण मोठमोठ्या कलाकरांना देखील विसराल.
अनेक स्टार्स किड्सच्या बाबतीत सर्वात वेगळी आणि बोल्ड सोशल मीडियावरील पोस्टमुळे नेहमी चर्चेचा विषय बनणारी किड्स म्हणजे कृष्णा श्रॉफ. जॅकी श्रॉफची लेक आणि टायगर श्रॉफची बहीण असलेली कृष्णा श्रॉफ ही अभिनयात नसली, तरी तिच्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच सर्वांच्या चर्चेचा विषय असते. सोबतच ती तिच्या विविध टॅटूमुळे देखील ओळखली जाते. तिने तिच्या शरीराच्या अनेक भागांवर टॅटू गोंदवले आहेत. इंस्टाग्राम अकाऊंटवर फक्त बिकिनी मधील फोटो पोस्ट करणारी कृष्णा पुन्हा एकदा तिच्या नवीन फोटोंमुळे चर्चेत आली आहे.
यावेळी कृष्णा श्रॉफने तिचे काळ्या ड्रेसमधील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहे. हे फोटो पोस्ट करताना तिने “नॉट योर बेब” असे कॅप्शन दिले आहे. या ड्रेसमधील चार वेगवेगळ्या पोजमधील फोटो पाहून नेटकऱ्यांनी या फोटोंवर भन्नाट कमेंट केल्या आहेत. काही जणांनी तिला ट्रोल केले आहे, तर काहींना तिचा हा नवीन लूक खूप आवडला आहे.
कृष्णाच्या या फोटोवर काहींनी लिहिले आहे की, “पहिल्यांदा तुला कपड्यांत पाहिले.” तर अन्य एकाने “पूर्ण कपड्यांत तू सुंदर दिसतेय,” अशी कमेंट करत, कृष्णाची फिरकी घेतली आहे. तर “नशीब, तू कपडे घातलेस, असे एकाने लिहिले आहे.”
कृष्णा श्रॉफ तिच्या फिटनेसमुळे आणि तिच्या रिलेशनशिप स्टेटसमुळे नेहमी सोशल मीडियावर चर्चेत असते. कृष्णाने बॉलिवूडच्या ग्लॅमरस दुनियेपासून दूर राहणे पसंत केले. पण म्हणून ती कमी ग्लॅमरस नाही. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट बोल्ड फोटोंनी भरलेले आहे. कृष्णा सोशल मीडियावर अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच आपल्या मित्रांसोबत पार्टी करताना दिसते. कृष्णाला पडद्यामागे राहणे पसंत आहे.
मीडिया रिपोर्टनुसार करण जोहरने २०१२ मध्ये आलेल्या त्याच्या ‘स्टुडंट ऑफ इअर’ सिनेमाची कृष्णाला ऑफर दिली होती. मात्र तिने ही ऑफर नाकारली आणि ही भूमिका नंतर आलिया भटला मिळाली.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेत्री लग्नाआधीच होणार आई; फोटो शेअर करत दिली ‘गुडन्यूज’
-अरे व्वा! ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्याने रचलाय नवीन विक्रम; आठव्यांदा साकारणार ‘महादेवा’ची भूमिका