Saturday, July 6, 2024

‘मर जाऊं यही पे’ मृत्यूआधी बोललेले शब्द पुढच्या काही मिनिटांत ठरले खरे, गायक केकेंच्या शेवटच्या क्षणांचा ‘तो’ ह्रदयस्पर्शी किस्सा

मृत्यू, योगायोग, नशीब, या सगळ्या गोष्टी वाटताना काल्पनिक वाटत असल्या तरी याचा अनुभव अनेकदा मानसाला येत असतो. काही मिनिटांपूर्वी ठिकठाक गाणे गाणारी व्यक्ती जर या जगाचा निरोप घेणारी बातमी समोर आली तर प्रत्येकालाच धक्का बसल्याशिवाय राहत नाही. असाच धक्का लोकप्रिय गायक कृष्णकुमार कुन्नथ (Krishnakumar Kunnath)  यांच्या मृत्यूने देशभरातील त्यांच्या चाहत्यांना बसला आहे. पण या मृत्यूआधी त्यांच्या एका वाक्य काही मिनिटांनी खरं होईल असं त्यांनाही वाटल नसेल. काय होत ते वाक्य चला जाणून घेऊ. 

आपल्या जादुई आवाजाने अनेक दशके हिंदी संगीत जगतावर राज्य करणाऱ्या गायक केके यांच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला आहे. मंगळवारी (३१ मे) कोलकत्तामध्ये लाईव्ह कार्यक्रम करत असतानाच ह्रदय विकाराच्या झटक्याने गायक केके यांचे दुखःद निधन झाले. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. सध्या त्यांच्या कार्यक्रमातील एका वाक्याची सगळीकडे चांगलीच चर्चा होताना दिसत आहे, ज्यामध्ये आपल्या मृत्यूची चाहुल गायक केकेंना लागली होती का असाच प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला आहे.

कोलकत्त्यामधील कार्यक्रमात गायक केके त्यांचे गाजलेले ‘ओम शांती ओम’ चित्रपटातील आंखों मे तेरी अजबसी अजबसी अदाए है हे गाणे सादर करत होते. या लोकप्रिय गाण्याला उपस्थित प्रेक्षकांचा अभूतपुर्व प्रतिसाद पाहायला मिळत होता. या प्रतिसादाने केके खूपच आनंदी झाले होते. यामध्ये महिलांनी जोरदार प्रतिसाद दिला होता. त्यामुळेच केकेंनी त्यांचा हा उत्साह पाहून गमतीने “हायें मर जाऊं यही पे” असे म्हणत  या प्रतिसादाला दाद दिली.

पण केकेंनी नकळत उच्चारलेले हे शब्द काही मिनिटांनी खरे होतील याची कोणी कल्पनाही केली नसेल. यानंतर त्यांना हळुहळु त्रास जाणवायला लागला. आणि याच त्रासात तिव्र ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे दुखःद निधन झाले. एका प्रतिभावान लोकप्रिय गायकाने घेतलेली ही एक्झिट सर्वांनाच मनाला चटका लावून गेली आहे. सध्या केकेंच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे.

हे देखील वाचा