Monday, December 9, 2024
Home कॅलेंडर केकेची एकूण कमाई जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, रोज खेळायचा लाखोंमध्ये

केकेची एकूण कमाई जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल, रोज खेळायचा लाखोंमध्ये

बॉलिवूडचा सर्वात लोकप्रिय पार्श्वगायक आणि स्टेज परफॉर्मर केके कृष्णकुमार कुन्नथ यांचे 31 मे, 2022 रोजी कोलकाता येथे अचानक निधन झाले होते. त्यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले गेले होते. मृत्यूपूर्वी त्यांनी लाईव्ह कॉन्सर्ट केला होता. त्यादरम्यान त्यांची तब्येत बिघडू लागली, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. जिथे त्यांच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्यांच्या निधनामुळे कलाविश्वाचे मोठे नुकसान झाले होते. बुधवारी (दि. 23 ऑगस्ट) गायक केकेंचा जन्मदिवस. जाणून घेऊया त्यांच्या प्रवासाबद्दल…

आपल्या आवाजाची जादू उधळणारे गायक केके (KK) यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला होता. केकेच्या चाहत्यांपासून ते संगीत जगतातील मोठ्या सेलिब्रिटींपर्यंत, ओल्या डोळ्यांनी त्यांना आदरांजली वाहिली. यशाचे शिखर गाठणारा केके दररोज किती कमाई करायचे अनेकांना माहिती नसेल. तर ते दररोज लाखोंची कमाई करत असे. होय, केके त्याच्या अल्बम आणि स्टेज शोमधून लाखोंची कमाई करत असे. प्रसिद्ध गायक केके यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी किती संपत्ती सोडली आहे ते जाणून घेऊयात…

केके म्हणून लोकप्रिय झालेल्या गायकाचे पूर्ण नाव कृष्ण कुमार कुन्नथ होते. पण ते केके या नावानेच रंगमंचावर प्रसिद्ध होते. केकेंचा जन्म दिल्लीतील एका मल्याळी कुटुंबात दिल्ली येथे 23 ऑगस्ट 1968 रोजी झाला होता. केके यांनी दिल्लीतून शिक्षण पूर्ण केले. त्यांचे शालेय शिक्षण माउंट सेंट मेरीज येथून झाले. त्याच वेळी, त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या किरोरी माल महाविद्यालयातून पदवी संपादन केली. केके यांना लहानपणापासूनच संगीताची आवड होती. आपल्याला सांगूया की दिग्गज संगीतकार केके यांनी कोणतेही संगीत प्रशिक्षण घेतलेले नाही. तरीही त्यांनी हिंदीशिवाय इतर अनेक भाषांमधील गाण्यांना आवाज दिला.

केकेने आपल्या करिअरची सुरुवात जिंगल्स गाऊन केली. केकेला एआर रहमानने चित्रपटांमध्ये गाण्यासाठी ब्रेक दिला होता, त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. आम्ही तुम्हाला सांगतो की सेलेबवर्थ या प्रसिद्ध सेलिब्रिटींच्या कमाई आणि मालमत्तेचा मागोवा घेणार्‍या वेबसाइटने खुलासा केला आहे की केके दररोज लाखोंमध्ये कमावत होता. माध्यमांतील वृत्तानुसार, त्यांची एकूण संपत्ती 8 मिलियन म्हणजेच 62.06 कोटी रुपये होती. रॉयल्टी आणि स्टेज शो इत्यादींमधून ते दररोज सुमारे 2739.73 डॉलर्स म्हणजेच 2,12,557.16 रुपये कमवत असे.

महत्त्वाच्या बातम्या-
भांडं फुटलं रे! तेजस्वी प्रकाश अन् करण कुंद्राने गुपचूप केलं लग्न? ‘त्या’ पोस्टमुळे सर्वत्र माजली खळबळ
चांद्रयान-3 मिशनबद्दल वादग्रस्त पोस्ट केल्याने अभिनेते अडचणीत, हिंदू संघटनांनी पोलिसात तक्रार केली दाखल

author avatar
Tejswini Patil

हे देखील वाचा