हिंदी सिने जगतात नेहमीच कोणत्या ना कोणत्या अभिनेत्री आणि अभिनेत्यांमध्ये प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या बातम्या समोर येत असतात. यामध्ये काही बातम्या खऱ्या ठरतात तर काही बातम्या निव्वळ अफवा असतात.काही दिवसांपूर्वी अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Sanon) आणि कार्तिक आर्यनच्या (Kartik Aryan) प्रेमप्रकरणाचीही बरीच चर्चा रंगली होती. दोघांचे परदेशात फिरतानाचे अनेक फोटो व्हायरल झाले होते ज्यामुळे या चर्चांना ऊत आला होता. या चर्चांवर आता पहिल्यांदाच अभिनेत्री क्रिती सेननने प्रतिक्रिया दिली आहे.
क्रिती सेनन ही बॉलिवूड जगतातील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. काही दिवसांपासून तिच्या आणि कार्तिक आर्यनच्या प्रेम प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली होती. यावर एका मुलाखतीत बोलताना क्रिती सेननने आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. याबद्दल बोलताना ती म्हणाली की, “माणसाने सगळ्या गोष्टींची माहिती घेतल्याशिवाय किंवा खात्री असल्याशिवाय काहीही बोलू नये. मला माहित नाही की सोशल मीडियाचा वापर आपल्यासाठी कितपत योग्य आहे मात्र या अफवांबद्दल बोलायचे झाले तर त्यामुळे मला काहीही त्रास होत नाही. कदाचित माझं आयुष्य तितकं भारी असतं.”
आपल्या सिने जगतातील प्रवासाबद्दल बोलताना क्रिती म्हणाली की, “मी सध्या अनेक चित्रपटांमध्ये व्यक्त आहे. प्रत्येक सेलिब्रेटीच्या आयुष्यात येणाऱ्या अडचणी मलाही येतात. बऱ्याचदा आपण जे बोललो नाही ते सुद्धा छापले जाते. ज्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो. ” दरम्यान अभिनेत्री क्रिती सेननचा बच्चन पांडे चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता. मात्र हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर खास कमाई करु शकला नाही. त्याचप्रमाणे ती लवकरच कार्तिक आर्यनसोबत शेहजादा चित्रपटातही झळकणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- हेही वाचा-
- ‘चित्रपट चालेल नं चालेल तो पुढचा विषय’. म्हणत हेमांगी कवीची आगामी चित्रपटाबद्दल केली पोस्ट झाली व्हायरल
- ‘प्रेक्षकांच्या प्रेमाचं परिवर्तन पुरस्कारांमध्ये’, रायझिंग स्टार सन्मानानंतर प्राजक्ता माळीने मानले सर्वांचे आभार
- मुघल ए आझम आणि पाकिजा सिनेमाच्या संगीतासाठी ओळखल्या जाणाऱ्या नौशाद यांचा संघर्षमयी प्रवास