बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन (Kriti Senon) सध्या तिच्या आगामी ‘तेरे इश्क में’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान, क्रितीने आज तिच्या सोशल मीडिया हँडलवर तिच्या पहिल्या टॅटूचे काही खास फोटो शेअर केले आहेत. रश्मिका मंदानाने कृतीच्या या पोस्टवर तिची प्रतिक्रिया शेअर केली आहे.
क्रिती सेननने आज तिच्या पहिल्या टॅटूचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आणि असेही सांगितले की ती हे कधीच करणार नव्हती, परंतु तिने तिच्या डाव्या पायावर उडणाऱ्या पक्ष्याचा टॅटू काढला आहे. क्रितीने हे सर्व अद्भुत फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून तिच्या चाहत्यांना आनंद दिला आहे.
क्रितीने लिहिले, ‘मी हे करेन असे कधीच वाटले नव्हते, पण कधीही म्हणू नका. नुकतेच टॅटू काढला आहे. एक वचन पूर्ण केले आहे. सूर्योदयापर्यंत मी उंच उडू शकते याची आठवण करून देणारी.’ क्रितीच्या या पोस्टवर रश्मिका मंदानाने लाल हृदयाचा इमोजी बनवला आहे.
‘क्रिती सेनन पुढे लिहिते, ‘ज्यांच्या डोळ्यात स्वप्ने आहेत त्यांच्यासाठी… ज्याची तुम्हाला भीती वाटते ती उडी घ्या… ते सोपे नसेल, पण तुम्हाला तुमचे पंख सापडतील, तुम्ही स्वतःला सापडाल, तुम्ही उडायला शिकाल.’ पुढे, क्रितीने टॅटू बनवणाऱ्याचे आभारही मानले.
क्रिती सेनन लवकरच ‘तेरे इश्क में’ या चित्रपटात दिसणार आहे. हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे. हा चित्रपट आनंद एल. राय यांनी दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात दाक्षिणात्य सुपरस्टार धनुष आणि बॉलिवूड अभिनेत्री कृती सेनन पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. चित्रपटाचे संगीत प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रहमान यांनी दिले आहे. हा चित्रपट हिंदी आणि तमिळ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
शाहिद कपूरच्या ‘ओ रोमियो’ चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित, ही अभिनेत्री दिसणार मुख्य भूमिकेत
बेकायदेशीर सट्टेबाजी प्रकरणात अडकल्या उर्वशी रौतेला आणि मिमी चक्रवर्ती, ईडीने पाठवले समन्स










