Saturday, December 21, 2024
[aioseo_breadcrumbs]

अंतिम निकालापर्यंत सलमानबद्दल पोस्ट शेअर करण्यासाठी केआरकेवर घालण्यात आला प्रतिबंध; न्यायालयाने जारी केले आदेश

गेल्या काही दिवसांपासून कमाल आर खान (केआरके) आणि सलमान खान यांच्यात बराच वादविवाद चालू आहे. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, मुंबईच्या न्यायालयाने केआरकेविरोधात सलमान खानने दाखल केलेल्या मानहानीच्या खटल्याचा पाठपुरावा केला आहे. त्यानुसार केआरकेला सलमानबद्दल किंवा त्याच्या चित्रपटांबद्दल कोणतीही बदनामीकारक पोस्ट शेअर करण्यास प्रतिबंधित केले आहे. सलमानने दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी करत, न्यायालयाने हा अंतरिम आदेश जारी केला आहे. महत्वाचे म्हणजे जोपर्यंत न्यायालय निकाल देत नाही, तोपर्यंत हा निर्णय कायम राहील.

सलमानचे वकील प्रदीप गांधी यांच्या म्हणण्यानुसार, कमाल हा एक असा सवयीचा गुन्हेगार आहे, जो बदनामी आणि बदनामीकारक गोष्टींचा प्रचार करण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा गैरवापर करतो. कमाल हे सगळं विनाकारण करतो, असे गांधी त्या व्हिडिओकडे लक्ष वेधत म्हणाले, जे कमालने सलमान, त्याच्या कुटुंबातील सदस्य, त्याचे चित्रपट आणि व्यवसाय संघटना विरोधात पोस्ट केले होते.

कमाल आर खानची बाजू मांडत, वकील मनोज गडकरी यांनी या आरोपांना कडाडून विरोध दर्शविला. गडकरी म्हणाले की, सलमान ही एक सेलिब्रिटी आहे आणि म्हणूनच त्याने त्याच्यावर होणाऱ्या टीकेसाठी तयार असले पाहिजे. गडकरी यांच्या म्हणण्यानुसार कमाल यांनी राधे चित्रपटाबद्दल केवळ मत व्यक्त केले होते आणि हे मत समाजात सलमानची प्रतिमा कमी करत नाहीत, असेही त्यांनी नमूद केले.

कमाल खानबद्दल बोलायचे झाले, तर त्याचा वादांशी जुना संबंध आहे. त्यांच्या बढाईखोरपणामुळे तो कोणावरही टीका किंवा वक्तव्य करताना दिसतो. पण त्याचे असे वागणे आता त्यालाच महागात पडत असल्याचे दिसत आहे. कारण यावेळी त्याने सलमानसोबत वाद घातला आहे. तसेच, त्याने असेही म्हटले आहे की, तो सलमानला बरबाद करेल.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘…नैणा ठग लेंगे’, म्हणत प्रार्थना बेहेरेच्या नजरेने केला चाहत्यांच्या हृदयावर वार; ग्लॅमरस फोटो होतायेत व्हायरल

-नववारी साडीमध्ये खुललं अपूर्वा नेमळेकरचं सौंदर्य; तर कॅप्शननेही वेधलं अनेकांचं लक्ष

-स्पृहा जोशीचे लाजने पाहून चुकला चाहत्यांच्या काळजाचा ठोका; व्हिडिओवर पडतोय लाईक्सचा पाऊस

हे देखील वाचा